Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशCongress : कॉंग्रेसच्याच कार्यक्रमात बंद झाला राहुल गांधींचा माईक; संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात...

Congress : कॉंग्रेसच्याच कार्यक्रमात बंद झाला राहुल गांधींचा माईक; संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात घडला प्रकार

Subscribe

संसदेत बोलताना अनेकदा माईक बंद होण्याच्या घटना घडतात, आणि तेही विरोधी पक्षनेते राहुल गांधींसोबत. अशीच काहीशी घटना मंगळवारी संविधान दिनानिमित्त कॉंग्रेसने आयोजित कार्यक्रमातच घडली आणि ती देखील राहुल गांधींसोबतच.

नवी दिल्ली : संसदेत बोलताना अनेकदा माईक बंद होण्याच्या घटना घडतात, आणि तेही विरोधी पक्षनेते राहुल गांधींसोबत. अशीच काहीशी घटना मंगळवारी संविधान दिनानिमित्त कॉंग्रेसने आयोजित कार्यक्रमातच घडली आणि ती देखील राहुल गांधींसोबतच. या घटनेचाही राहुल गांधी यांनी आनंद घेतला. (rahul gandhi mic off in program of indian constitution by arrenged congress in new delhi)

संविधान दिनानिमित्ताने तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित एका कार्यक्रमाला राहुल गांधी संबोधित करत होते. या कार्यक्रमाचे आयोजन कॉंग्रेसने केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा माईक बंद झाला. ज्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, संसदेत आपला माईक बंद केला जात असल्याची तक्रार राहुल गांधी यांनी अनेकदा केली आहे. आता स्वतःच्या पक्षाच्याच कार्यक्रमात माईक बंद झाल्यानंतरही राहुल गांधी हसताना दिसले.

- Advertisement -

हेही वाचा – Supreme Court : असे विचार येतात तरी कुठून? पुन्हा मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

माईक सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. या देशात जे दलित आणि मागासवर्गीयांबाबत बोलतात, त्यांचे आवाज (माईक) अशाच पद्धतीने बंद केले जात असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही माईक बंद करा, पण मला बोलण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

- Advertisement -

या कार्यक्रमा दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीय जनगणनेची मागणी केली. देशातील महत्त्वाच्या उद्योगपतींमध्ये कोणीही दलित, मागसवर्गीय किंवा आदिवासी समाजातील नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणनेचे काम सुरू केले. यात जे प्रश्न विचारले जात आहेत ते राज्यातील दलित, मागासवर्गीय आणि गरिबांनी तयार केले आहेत. म्हणजेच, जातनिहाय जनगणनेचे स्वरूप तेलंगणाच्या जनतेने ठरवले आहे. ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. जिथे आमचे सरकार असेल, तिथे आम्ही अशाच पद्धतीने जातनिहाय जनगणना करू, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, संविधान केवळ एक पुस्तक नाही. तर ती भारताची गेल्या हजारो वर्षांची विचारसरणी आहे. यात गांधी, आंबेडकर, भगवान बुद्ध, फुले अशा महान लोकांच्या विचारांचा समावेश आहे. मात्र, यात सावरकरांच्या विचारांचा समावेश नाही. हिंसा करा, असे संविधानात कुठेही लिहिले नसल्याचेही ते म्हणाले. (rahul gandhi mic off in program of indian constitution by arrenged congress in new delhi)

हेही वाचा – Pakistan : भगव्या टोप्या घालून मैदानात उतरला पाकिस्तानचा संघ; हे आहे कारण…


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -