नवी दिल्ली – संसदेत गुरुवारी सकाळी धक्काबुक्कीची घटना घडली. यानंतर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी दिवसभर वक्तव्य येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी म्हटले की, आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. मात्र भाजपने मसल पॉवर दाखवली. त्यांना मुख्य मुद्यावरुन – अदानीवरुन लक्षविचलित करायचे आहे, त्यासाठीचे हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांच्यावर भाजपने धक्काबुक्कीचा आरोप केला आहे, तर राहुल गांधींनी म्हटले आहे की आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखले जात होते. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
अदानी मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी…
आमच्याकडे हा मुद्दा होता की अदाणी देशाला लुटत आहेत आणि त्या मुद्द्यावरुन आम्ही सरकारला प्रश्न करत होतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संविधानाबाबत चर्चा सुरु झाली त्यावेळी अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडवली. तुम्ही किती वेळा आंबेडकर-आंबेडकर असं म्हणता, त्याऐवजी तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला सात जन्म स्वर्ग मिळाला असता. एखाद्या पक्षाची जर ही मानसिकता असेल, तर ती निषेधार्ह आहे. अशा गोष्टी तुम्ही देशापुढे ठेवणार असाल तर काय बोलणार? असा सवाल करत खर्गे म्हणाले की,
एवढंच नाही तर त्यांच्यापैकी कुणीही चूक मान्य करायला तयार नाही.
अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आंदोलन करत आहोत. राहुल गांधी म्हणाले की, यांचा हा सर्व प्रयत्न फक्त अदानी मुद्यावरुन लक्षविचलीत करण्याचा प्रकार आहे.
#WATCH | Delhi: Congress president Mallikarjun Kharge says, “…They (BJP MPs) stopped us at the door and did this to show their muscle power. They forcefully attacked us. I am not in a position to push anyone, but they pushed me. Now they are accusing us that we pushed them…So… pic.twitter.com/01rRE3GaGt
— ANI (@ANI) December 19, 2024
Edited by – Unmesh Khandale