हेलिकॉप्टर आणि जहाजांनी नाही तर देशातील नागरिकांमुळेच देश सक्षम – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हेलिकॉप्टर, जहाज आणि तोफांनी देश सक्षम होत नाही. तर देश तेव्हाच मजबूत होतो. जेव्हा देशातील नागरिक सक्षम असतो. असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तराखंडच्या देहरादून येथील आयोजित सभेत बोलत होते. हिंदुस्तान मजबूत होत आहे तुम्ही असा अजिबात विचार करू नका आणि या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका. कारण देश केवळ हेलिकॉप्टर, जहाज आणि तोफांनी सक्षम होत नाही. तर देशातील नागरिक सक्षम असेल तरच देश सक्षम होतो. हे मोदी सरकारने समजून घ्यायला हवं. जेव्हा देशातील जनता समोरच्या कोणत्याही व्यक्तीला न घाबरता भितीविना काम करते. तेव्हा त्याच्या आवाज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचू शकतो. असं राहुल गांधी म्हणाले.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, बांगलादेश युद्धावेळी मजबूत होता. तेव्हा सैन्य आणि सरकारमध्ये समन्वय होता. सरकार आणि सैन्य हे दोन्ही ऐकमेकांचे ऐकायचे आणि आदरही करत होते. कारण तेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. परंतु आजची परिस्थिती पाहिली असता ती पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. असं राहुल गांधी म्हणाले.