कोरोनाची तिसऱ्या लाटेच्याविरोधात राहुल गांधींची श्वेतपत्रिका, मोदी सरकारला मदतीसाठी हात पुढे

देशातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकारकडून अनेक चूका

rahul gandhi release White Paper against the third wave of Corona helping hand to the Modi government

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असल्याची टीका वारंवार काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी करत होते. परंतु आता राहुल गांधी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी श्वेतपत्रिका काढली असून कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. मोदी सरकारवर टीका करण्याचा हेतू नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्याबाबत श्वेतपत्रिका काढली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली असल्याचे सांगितले आहे. व्हिसीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी संवाद साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, देशात आणि जगभरात कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित असल्यामुळे देशात केंद्र सरकारने या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असावे असा आमचा हेतु आहे. केंद्र सरकावर टीक करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली नसून केवळ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. कोरोनविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला मदतीचा हात पुढे करत आहोत अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.

दुसऱ्या लाटेतील कामात अनेक त्रुटी

देशातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकारकडून अनेक चूका झाल्या आहेत. या सगळ्या चूका श्वेतपत्रिकेत नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक त्रुटी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यास काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतची ब्ल्यूप्रिट असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली आहे.

श्वेतपत्रिकेतील पहिला खांब

देशात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे यापैकी ९० टक्के कोरोनारुग्णांचे प्राण वाचवता आले असते. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही परंतु ऑक्सिजनमुळे लोकांचा जीव वाचू शकतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेनुसार चार खांब ठरविण्यात आले असून यातील पहिला खांब हा लसीकरण आहे. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच सर्वच राज्यात पुरेसा औषध साठा उपलब्ध असला पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

देशातील प्रत्येक राज्यात पुरशी औषधे, रुग्णालयांत आयसीयू बेड, व्हेंटिलेटर,बेड्स अशा वैद्यकीय संसाधनांची उपलब्धता आहे का नाही हे पाहिले पाहिजे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहिला पाहिजे अस मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.