Homeदेश-विदेशRahul Gandhi : संसदेच्या पायऱ्यांवरून धक्का दिल्याचा भाजप खासदार आरोप, राहुल गांधींनी...

Rahul Gandhi : संसदेच्या पायऱ्यांवरून धक्का दिल्याचा भाजप खासदार आरोप, राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले…

Subscribe

Bjp Mp Pratap Sarangi Injured : भाजपचे खासदार प्रताप सारंग संसदेच्या पायऱ्यांवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेत काँग्रेस विरुद्ध भाजप, असा वाद सुरू झाला आहे. दोन्हींकडून एकमेकांविरुद्ध संसदेच्या परिसरात आंदोलन करण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते, राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजपच्या खासदारानं केला आहे. यात खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

भाजपचे खासदार प्रताप सारंग संसदेच्या पायऱ्यांवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यासह खासदार मुकेश राजपूत यांनाही दुखापत झाली आहे. राहुल गांधी यांनी धक्का दिल्यानं संसदेच्या पायऱ्यांवरून पडलो, असा आरोप खासदार प्रताप सारंगी यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप खासदार संसदेच्या पायऱ्यांवरून पडले, डोक्याला गंभीर दुखापत; राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप

प्रताप सारंगी यांच्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कॅमेऱ्यात सगळी घटना कैद झाली आहे. मी संसदेत जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, भाजपच्या खासदारांनी मला धक्का दिला आणि धमकावलं. मल्लिकार्जून खर्गे यांनाही धक्का दिला. धक्का-बुक्की केल्यानं आम्हाला काही होत नाही. भाजप खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून थांबवू शकत नाहीत.”

- Advertisement -

दरम्यान, प्रताप सारंगी पडल्यानंतर राहुल गांधी त्यांना पाहण्यासाठी तिथे आले. मात्र, भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. तिथे उपस्थित असलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “काय राहुल, गुंडगिरी करताना लाज वाटत नाही.. वृद्धाला ढकलून दिले.”

त्यावर राहुल गांधी यांनी म्हटलं, “यांनी मला धक्का दिला.” यानंतर राहुल गांधी निघून गेले. पण, यावेळी भाजपच्या खासदारांनी एकच घोषणाबाजी केली.

हेही वाचा : रेशीमबागेत जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले, “हाफ चड्डी…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -