National Herald Case : राहुल गांधी परदेशातून भारतात परतले, ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काल ईडीने (ED) पुन्हा एकदा समन्स (Summons) बजावले होते. ते परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना १३जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राहुल (Rahul Gandhi Returned to India) गांधी हे परदेशातून भारतात परतले आहेत. तसेच भारतात दाखल होताच ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आता ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावरून काल रात्री दिल्लीमध्ये परतल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. ईडीने त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ईडीची नोटीस पाठण्यात आली आहे. त्यांना आठ जून रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कोरोनची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी हजर राहतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. २००८ मध्ये एजेएलजी सर्व प्रकाशनं बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रसने यंग इंडियन प्रायव्हेट लमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. परंतु नॅशनल हेराल्डची २ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे.


हेही वाचा : परदेशी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहणार का?