नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काही अद्याप संपलेली दिसत नाही. राहुल गांधी हे आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे त्यांनी हमालांची भेट घेतली. काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडीओ जारी केला असून त्यात म्हटले आहे की, ‘भारत जोडो यात्रा सुरूच आहे. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन जननेते राहुल गांधी यांनी भारताच्या अखंडतेचा प्रवास सुरू केला आहे. त्यांचा ताफा आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचला. राहुल यांनी हमालांच्या अडचणी, त्यांच्या भावना आणि समस्या ऐकल्या तसंच समजून घेतल्या. (Rahul Gandhi s motorcade reached Anand Vihar railway station in Delhi today Rahul listened and understood the problems of Hamal their feelings and problems )
राहुल गांधी आज सकाळीच आनंद विहार रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कुलींशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना होणारी मिळकत, त्यातून त्यांचं भागतं का आदी माहितीही त्यांनी घेतली. तसंच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची विचारणाही त्यांनी केला. काही कुलींनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आणि राहुल गांधींनी या हमालांनी भेटण्याचा प्लाल तयार केला.
(हेही वाचा: मोदी सरकारचा दणका; कॅनडाच्या नागरिकांना आता भारतीय व्हिसा मिळणार नाही )
कुली भाइयों के बीच जननायक pic.twitter.com/nor4tSyoR8
— Congress (@INCIndia) September 21, 2023
हमालांशी मनसोक्त गप्पा
राहुल गांधी या कुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनी हमालांना दिलेला त्यांचा गणवेश घातला. डोक्यावर सुटकेसही घेतली. काही काळ रेल्वे स्टेशनवर दिसले. राहुल गांधी हा कुलींच्या वेशातील फोटो व्हायरल झाला आहे.