घरदेश-विदेश'भूक, बेरोजगारी व आत्महत्या, मोदींचे देशाला तीन पर्याय'

‘भूक, बेरोजगारी व आत्महत्या, मोदींचे देशाला तीन पर्याय’

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पर्याय दिले आहेत असं सांगितलं. भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय मोदींनी देशाला दिले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. राहुल गांधी आज राजस्थानमधील अजमेर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांवर देखील भाष्य करताना देखील केंद्रावर जोरदार हल्ला चढवला.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापलं आहे. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्रावर टीका केली. कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी पर्याय दिले आहेत. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांशी चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे, उद्योजकांची नाही. असं राहुल गांधी म्हणाले.

राजस्थानमधील रुपनगढ येथे शनिवारी राहुल गांधी यांनी किसान महापंचायतीला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली देखील काढली, राहुल गांधींनी ट्रॅक्टरवर बसून या रॅलीची सुरूवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – आमचे मित्र ‘जनता’, ‘जावई’ नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -