राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रथमच बहिणीचा सहभाग, चर्चेला उधाण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही यात्रा मध्यप्रदेशमध्ये पोहोचली आहे. परंतु ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचताच राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी देखील सहभाग घेतला आहे. 3570 किलोमीटरच्या या पदयात्रेत त्यांनी सहभाग घेतला असून चर्चेला उधाण आलं आहे. मध्य प्रदेशात 12 दिवस भारत जोडो यात्रा असणार आहे.

मध्यप्रदेशमधील बोरगावमधून ही यात्रा सुरू झाली असून ती बडोदा अहीर या ठिकाणी पोहोचणार आहे. रात्री 8 वाजेपर्यत ही यात्रा सुरु राहणार असून त्यानंतर विश्रांतीसाठी ती थांबणार आहे. दक्षिणेकडील राज्यातील यात्रेदरम्यान न दिसलेल्या प्रियंका गांधी आता या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडेपर्यंत त्या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र आता मध्यप्रदेशातील यात्रेदरम्यान त्यांचा सहभाग दिसून आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा रंगत आहेत.

मध्य प्रदेशात सध्या भाजपचं सरकार आहे. एकेकाळी हा भाजपचा बालेकिल्ला होता. त्यामुळे ही जागा परत मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या 16 जागांचं महत्त्व काँग्रेसससाठी अनन्यसाधारण आहे.


हेही वाचा : स्मोकिंगचा संबंधच नाही.., मग का वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका?