Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'कर वसुलीवरच चालतं केंद्र सरकार', पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर राहुल गांधींचा निशाणा

‘कर वसुलीवरच चालतं केंद्र सरकार’, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर राहुल गांधींचा निशाणा

Related Story

- Advertisement -

दिल्लीत पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पार गेल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार कर वसुलीवर चालत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्रावर केला. देशभरात इंधन दर वाढविण्यात आले आहेत, ज्यामुळे वेगवेगळ्या राज्यांत पेट्रोल डिझेलचे भाव वेगवेगळे आहेत. राहुल गांधींनी Tax Extortion म्हणजेच टॅक्स खंडणी असं हॅशटॅग वापरुन एक ट्विट केले आहे. त्यात असे म्हटले की, ‘तुमचे वाहन पेट्रोल असो की डिझेलवर चालते, मात्र मोदी सरकार केवळ कर वसुलीवर चालते!’ मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत आज प्रतिलिटर १०० रूपयांवर गेली असून दिल्लीत पेट्रोल १००.२१ रुपयांवर विकले जात आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८९.५३ रुपये आहे.

देशभरात सातत्याने इंधनाचे दर वाढत असून अनेक राज्यांत १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत १०८.६३ रुपये तर कोलकातामध्ये १००.२३ रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, कॉंग्रेसने ७ जुलैपासून महागाईविरोधात १० दिवसांचे देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय देखील घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कॉंग्रेसकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जिल्हापातळीवर सायकल यात्रा काढणार आहेत. याशिवाय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते राज्यस्तरावर मोर्चा देखील काढणार आहे. तसेच, इंधनाच्या किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात कोरोना लस नसल्याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. दुसरीकडे, केंद्राने हे स्पष्ट केले आहे की, जुलैमध्ये साधारण १२ कोटी डोस विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील. यासह, लसीकरण मोहीम आणखी वेगाने करण्यात येणार आहे.


म्हणून मी भाजप प्रवेश केला, कृपाशंकर सिंह यांनी सांगितले कारण

- Advertisement -