घरदेश-विदेशराहुल गांधींचा चिनी आयातीवरून मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, 'जुमला फॉर इंडिया, जॉब्स...

राहुल गांधींचा चिनी आयातीवरून मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चायना’

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडीओही शेअर केलाय, ज्यात चीनमधून होणाऱ्या आयातीबाबत काही आकडे दाखवण्यात आलेत. तसेच राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाची क्लिपही देण्यात आलीय.

नवी दिल्लीः मोदी सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय. यावेळीही राहुल गांधींनी चीनचा हवाला देत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी ट्विटरवर ‘जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चायना’ असे लिहून मोदी सरकारची खिल्ली उडवली.

मोदी सरकारने संघटित क्षेत्र उद्ध्वस्त केले – राहुल गांधी

राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडीओही शेअर केलाय, ज्यात चीनमधून होणाऱ्या आयातीबाबत काही आकडे दाखवण्यात आलेत. तसेच राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाची क्लिपही देण्यात आलीय. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चायना” मोदी सरकारने संघटित क्षेत्र आणि एमएसएमई नष्ट केलेत, जे जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करणारं क्षेत्र आहे. मेक इन इंडिया म्हणजे आता चीनकडून खरेदी करा, असे झालेय.

- Advertisement -

2021 मध्ये चीनमधून विक्रमी आयात

राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यूपीए सरकार आणि एनडीए सरकारची आकडेवारी देण्यात आलीय. यामध्ये 2014 पासून चीनकडून होणारी आयात कशी वेगाने वाढत आहे हे सांगण्यात आलेय. 2021 मध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीत 46 टक्क्यांनी विक्रमी वाढ झालीय. त्यानंतर भारतातील बेरोजगारीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यानंतर राहुल गांधींनी संसदेत दिलेल्या भाषणातही बेरोजगारीचा उल्लेख केलाय.

- Advertisement -

दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती. “केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आले. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, मी अशा विधानाचे समर्थन करत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कारभारवर प्रश्न उपस्थित केला होता.


हेही वाचाः मोदी सरकारमुळेच चीन-पाक एकत्र; आता राहुल गांधींच्या टीकेवर अमेरिका म्हणते…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -