Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- 'सदियों का बनाया, पलों में...

राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- ‘सदियों का बनाया, पलों में मिटाया’

Related Story

- Advertisement -

कॉंग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच केंद्र सरकारला विविध विषयांवर घेराव घालण्याचा प्रयत्न करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य करत चांगलाच हल्लबोल केला आहे. कोरोना लसीचा अभाव, एलएसी, बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांच्या समस्या याबद्दल त्यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे लिहिले की, वेगळ्या पद्धतीने लिहिले, “सदियों का बनाया पलों में मिटाया, देश जानता है कौन ये कठिन दौर लाया।” गुरूवारी राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसतेय. राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारविरोधात कठोर भूमिका घेतांना दिसतात.

- Advertisement -

कोरोना लसीकरण मोहीम असो किंवा या महामारीवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला आलेलं अपयश असो, इंधन दरामध्ये सातत्याने वाढ होण्याचा मुद्दा असो किंवा चीनबरोबरचा सीमा विवाद, अशा मुद्द्यांवर राहुल यांनी भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या आठवड्यात राहुल यांनी खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीबद्दलही ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘खाया भी, ‘मित्रों’ को खिलाया भी. बस जनता को खाने नहीं दे रहे.’ यावेळी त्यांनी आपल्या ट्विटसह Price Hike हॅशटॅगचा वापर देखील केला होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात कोरोना लस नसल्याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. दुसरीकडे, केंद्राने हे स्पष्ट केले आहे की, जुलैमध्ये साधारण १२ कोटी डोस विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील. यासह, लसीकरण मोहीम आणखी वेगाने करण्यात येणार आहे.


- Advertisement -