घरदेश-विदेशRahul Gandhi : राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक! पश्चिम बंगालमधील घटना

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक! पश्चिम बंगालमधील घटना

Subscribe

बिहार राज्यातून पश्चिम बंगाल राज्यात दाखल होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली. यामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीची काच फुटली. या हल्ल्यानंतर राहुल गांधी गाडीतून खाली उतरले. त्या गाडीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरीही प्रवास करत होते

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मालदा येथे खासदार राहुल गांधींच्या गाडीवर अचानक हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. बुधवारी (31 जानेवारी) दुपारी बिहारहून पश्चिम बंगालमधील मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रा दाखल होत असतानाच ही घटना घडली. या दगडफेकीत खासदार राहुल गांधीच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, यामध्ये कुणी जखमी झाले आहे की नाही? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. (Rahul Gandhi Throwing stones at Rahul Gandhis car Incidents in West Bengal)

बिहार राज्यातून पश्चिम बंगाल राज्यात दाखल होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली. यामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीची काच फुटली. या हल्ल्यानंतर राहुल गांधी गाडीतून खाली उतरले. त्या गाडीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरीही प्रवास करत होते. ते म्हणाले की, मी गाडीच्या आत होतो. मागून वीट कोण फेकत आहे ते मला दिसले नाही. मात्र बंगालमध्ये प्रत्येक पावलावर राहुल गांधी यांना रोखले जात आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, राहुल यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ कार्यक्रमाला बंगालमध्ये प्रवेश केल्यापासून विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागल्याची तक्रार त्यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2024: जनधन योजनेला महिलांची पसंती; खाते उघडण्यात मारली ‘फिफ्टी’

बिहारमध्ये झाली चेंगराचेंगरी

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहार राज्यात असताना बुधवारी कटिहार येथे खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा केली. राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पुढे येत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 18 वा दिवस आहे. खासदार राहुल गांधी यांनी प्रवासात मिरचाईबारी डीएस कॉलेजमार्गे लाभा येथील जाहीर सभेनंतर ते बंगालमध्ये रवाना झाले.

- Advertisement -

हेही वाचा : Rohit Pawar :…तर देशात लोकशाही होती; चंदीगड महापालिका निवडणुकीवरुन रोहित पवारांची भाजपवर टीका

अशी आहे राहुल गांधी यांची न्याय यात्रा

14 जानेवारी 2024 रोजी मणिपूर येथून खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली. यात्रेदरम्यान 67 दिवसांत 6,713 किमीचे अंतर कापले जाणार आहे, जे 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 20 मार्चला मुंबईत संपेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रवास काँग्रेस पक्षासाठी मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. मात्र, याचा किती फायदा होईल? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -