घरताज्या घडामोडीनॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी, काँग्रेस आजही आंदोलन...

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधींची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी, काँग्रेस आजही आंदोलन करणार

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर होणार आहेत. यापूर्वी ईडीने राहुल गांधींची तीन दिवस चौकशी केली आहे. परंतु आज चौथ्यांदा राहुल गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलावलं असून ते पुन्हा एकदा चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. मात्र, काँग्रेस आजही आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राहुल गांधींना ईडीनं ज्या प्रकारे चौकशीसाठी बोलावलं होतं, त्यानंतर काँग्रेसनं त्याविरोधात देशव्यापी आंदोलन केलं होतं. आज पुन्हा एकदा काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या चौकशीत ईडीने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा १३ जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना पहिल्याच दिवशी जवळपास ५० प्रश्न विचारण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसचं भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावासाठी नौटंकी आंदोलन, भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

पहिल्याचं दिवशी राहुल गांधींची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सलग दोन दिवस ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. त्यामुळे देशातील काही राज्यासह महाराष्ट्रात देखील ईडी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि ईडीविरोधात मोर्चा काढला होता. तसेच त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली होती.

- Advertisement -

तृतीयपंथींनी सु्दधा मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजप कार्यालयात असल्याचे कळल्याने तृतीयपंथी मोर्चेकरांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना रोखून धरले होते. या आंदोलनादरम्यान तृतीयपंथीयांनी राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला होता.


हेही वाचा : भाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचे आंदोलन, राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -