घरCORONA UPDATEकोरोना, जीएसटीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कोरोना, जीएसटीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या वारंवार निशाणा साधला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या देशाला मोदी सरकारने योग्य प्रकारे हाताळले नसल्याचे राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा म्हटले आहे. तर आज त्यांनी केलेल्या ट्विटमधून तीन मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सध्या सुरू असलेले कोरोना संकट आणि यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय, ते म्हणजे नोटबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी. त्यामुळे राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच हावर्डमध्ये अपयशी केस स्टडीज म्हणून हे तीन विषय शिकवले जातील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत यावर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी मोदी यांचा एक व्हिडिओही सोबत शेअर केला आहे. यापूर्वीही अनेकदा राहुल गांधी यांनी मोदीवर विविध विषयांवरून धारेवर धरले आहे. नुकतेच लडाख येथे झालेल्या भारत – चीन चमकमीत शहीद झालेल्या जवानांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. तर कोरोनाचे संकट हाताळण्यास मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे, असेही राहुल गांधी वारंवार म्हणत आले आहेत.

हेही वाचा –

CoronaVirus: रशियाला मागे टाकत, भारत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -