घरदेश-विदेशRahul Gandhi : दबाव निर्माण होताच यू-टर्न घेतला, पण...; राहुल गांधींचा नितीश...

Rahul Gandhi : दबाव निर्माण होताच यू-टर्न घेतला, पण…; राहुल गांधींचा नितीश कुमार यांना मिश्कील टोला

Subscribe

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि एनडीए सोबतच सत्तास्थापन केली. नवव्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्याच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी नितीश कुमार यांच्यावर निशाणावर साधला आहे. दबाव निर्माण होताच यू-टर्न घेतला, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. (U turned as soon as the pressure builds Rahul Gandhi Nitish Kumar)

हेही वाचा –  Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा, ‘हे’ आहे कारण

- Advertisement -

भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (30 जानेवारी) पूर्णिया येथे जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी एनडीमध्ये सामील झालेल्या नितीश कुमार यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की, थोडासा दबाव पडताच त्यांनी (नितीश कुमरा) यू-टर्न घेतला. पण दबाव का? कारण आमची युती जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

नितीश कुमार यांच्याबद्दल एक गंमत सांगताना राहुल गांधी म्हणाले की, “अखिलेश यादव यांचे भाषण सुरू असताना बघेल यांनी मला एक गंमत सांगितली. तो विनोद तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आहे. तुमचे मुख्यमंत्री शपथविधीसाठी राज्यपालांच्या निवासस्थानी गेले. तिथे खूप जल्लोष होता. भाजप नेते आणि राज्यपाल त्याठिकाणी बसले होते. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेतली गेली. त्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री निवासस्थानाकडे रवाना झाले. कारमध्ये त्यांना आपली शाल राज्यपालांच्या घरी विसरल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी ड्रायव्हरला राज्यपालांच्या घरी परत जाण्यास सांगितले. ड्रायव्हर राज्यपालांकडे गेला आणि त्याठिकामी दरवाजा उघडताच राज्यपाल म्हणाले, ‘अरे, तुम्ही इतक्या लवकर का आलात?’ खरं तर अशी बिहारची अवस्था आहे. थोडासा दबाव येताच यू-टर्न घेतला जातो, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : एकत्र राहणाऱ्या समाजाला आज एकमेकांचे वैरी का करताय? वडेट्टीवारांचा सवाल

बिहारमध्ये जात जनगणना होऊ नये अशी भाजपाची इच्छा

नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, नितीश कुमार दबावाला बळी का पडले? हे लक्षात घ्यायला हवे. आम्ही नितीश कुमार यांना सांगितले होते की, तुम्हाला बिहारमध्ये जात जनगणना करावी लागेल, पण भाजपला बिहारमध्ये जात जनगणना नको होती. कारण ते देशाला सत्य सांगायला घाबरतात. जनतेचे लक्ष सामाजिक न्यायाकडे जाऊ नये, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजपाने नितीश कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि नितीश कुमार त्या मार्गावर निघून गेले, असे वक्तव्य करत राहुल गांधी यांनी भाजपावरही निशाणा साधला.

महाआघाडीला नितीशकुमार यांची गरज नाही

राहुल गांधी म्हणाले की, ‘महाआघाडी’ बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी लढा सुरूच ठेवेल आणि यासाठी आघाडीला मुख्यमंत्री नितीश कुमारांची गरज नाही. काँग्रेस ‘महाआघाडी’चा भाग आहे. त्यात आरजेडी आणि डावे पक्षही आहेत. त्यामुळे दलित, ओबीसी आणि इतरांची नेमकी लोकसंख्या निश्चित करण्यासाठी आपल्या देशाला जातीनिहाय जनगणनेची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -