Video: कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींचे भाकीत खरे ठरले, व्हिडिओ व्हायरल

rahul gandhi release White Paper against the third wave of Corona helping hand to the Modi government

नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केली. जवळपास वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून होते. शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेत, घरी परतण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. पण नव्या कृषी कायद्याच्या निमित्ताने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरल्याच्या आशयाचा हा व्हिडिओ आहे. याआधी वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. पंतप्रधान मोदींच्या आजच्या घोषणेनंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, माझे शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला कृषीविरोधी कायदे हे मागे घ्यावेच लागतील.

कॉंग्रेसच्या एका खासदाराने हा व्हिडिओ ट्विट करत राहुल गांधी नेमक काय म्हटल होते हेदेखील ट्विट केले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले आहे की, “Mark my words, the government will have to take back the anti-farm laws.” राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले होते की, शेतकरी जे काही सध्या करत आहेत, त्याचा मला गर्व आहे. मी त्यांच्यासोबत कायम उभा राहणार आहे. मी पंजाबच्या यात्रेतही हा विषय उचलून धरला होता. माझे शब्द लक्षात ठेवा, सरकारला कृषी विरोधी कायदे हे मागे घ्यावे लागतील. माझे शब्द लक्षात ठेवा.

राहुल गांधी यांनी आज एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये देशातील अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अहंकाराची मान खाली केली. अन्यायाविरोधातील विजयाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय हिंद का किसान ! अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. त्यासोबतच शेतकरी कायदे मागे घ्यावे लागतील हा व्हिडिओही ट्विट केला होता.

आज देशातील नवीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थतता पुर्णपणे दिसून आली. देशवासीयांना संबोधन करताना ५९ सेकंदांमध्ये पंतप्रधानांची झालेली चलबिचल ही दिसून आली. मोदींनी आपल्या भाषणामध्ये ”क्षमा, तपस्या, पवित्र ह्दय, प्रकाश जैसा सत्य, किसान भाइयों समझा नही पाया,” असे सांगत त्यांनी आपण शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे महत्व सांगण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले. त्यांची कायदे मागे घेण्याची वेदना याच वाक्यातून समोर आली. जेव्हा २०१४ मध्ये नेतृत्व मिळाले तेव्हापासून राष्ट्र सेवेच्या जबाबदारीत सर्वाधिक चिंता ही शेतकऱ्यांचीच केली आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांची चिंता केली, पण शेतकऱ्यांनी मात्र विश्वास ठेवला नाही, असेच काहीसे मोदी सांगण्याचा प्रयत्न करत होते.

जीत उनकी भी है जो

राहुल गांधी यांनी हम नही भुलेंगे अशा आशयाचा आणखी एक व्हिडिओ आज आपल्या ट्विटरवरून प्रकाशित केला आहे. या व्हिडिओत शेतकरी आंदोलनातील महत्वाच्या अशा घटनांचा फोटो असलेला व्हिडिओ आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर झालेला बळाचा वापर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. जीत उनकी भी है जो लौट के घर ना आए… हार उनकी ही है जो अन्नदाताओं की जान बचा ना पाए…


हेही वाचा – Farm laws : तिन्ही कृषी कायदे मागे घेताना ५९ सेकंदातच मोंदीची चलबिचल