घरदेश-विदेशRahul Gandhi : 'तुम्ही लग्न कधी करणार?' 6 वर्षाच्या मुलाने राहुल गांधींना विचारला...

Rahul Gandhi : ‘तुम्ही लग्न कधी करणार?’ 6 वर्षाच्या मुलाने राहुल गांधींना विचारला प्रश्न; असे मिळाले उत्तर…

Subscribe

पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशाचा दौरा करत आहेत. त्यांची यात्रा सध्या बिहारच्या किशनगंजमध्ये आहे. यावेळी एका 6 वर्षाच्या मुलाने राहुल गांधींना प्रश्न विचारला की, तुम्ही लग्न कधी करणार? दरम्यान, राहुल गांधी आणि त्या मुलाच्या संभाषणाचा व्हिडीओ 29 जानेवारीचा असून तो व्हायरल होत आहे. (Rahul Gandhi When will you get married A 6 year old boy asked Rahul Gandhi a question Arsh Nawaz)

हेही वाचा – Maratha Vs OBC : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटातील दोन आमदारांची मागणी

- Advertisement -

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गेल्या तीन दिवसांपासून बिहार राज्यात आहे.कटिहार, पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यातून त्यांच्या भारत जोडो न्यायेने प्रवास केला आहे. याचदरम्यान, अर्श नवाज हा 6 वर्षाचा मुलगा राहुल गांधींच्या बससमोर येऊन उभा राहिला. तो यूट्यूबवर ब्लॉग टाकण्याचे काम करतो. राहुल गांधी यांनी त्याला मांडीवर बसवले. यावेळी त्याने राहुल गांधींसोबत ब्लॉग तयार केला. यानंतर त्याने ब्लॉग यूट्यूबवर टाकला असून राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला आहे.

याचदरम्यान, त्याने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की, तुम्ही लग्न कधी करणार? यावर राहुल गांधी म्हणाले की, सध्या मी काम करतो आहे, काम संपल्यावर करेन. त्यामुळे आता राहुल गांधी त्याचं काम संपल्यावर खरंच लग्न करणार का? हे पाहावे लागेल. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास मणिपूरपासून सुरू झाला असून तो आसाम आणि पश्चिम बंगालमार्गे बिहारमध्ये पोहचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Siddhartha Lahiri : रोहित आर्मीला घाबरवण्यासाठी इंग्लंडने मागवला पाकिस्तानी खेळाडू; त्याचा कोच भारतीय

राहुल गांधींची बिहारी शैली लोकांना आवडली

दरम्यान, राहुल गांधी यांना पाहण्यासाठी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यांची बिहारी शैली लोकांना खूप आवडत आहे. राहुल गांधी यांचा एक फोटोही व्हायरल होत असून त्यात ते डोक्यावर टॉवेल बांधून कॉटवर बसल्याचे दिसत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, ‘शेतकऱ्यांना चारही बाजूंनी घेरले जात आहे. त्यांची जमीन हिसकावून घेतली जात आहे. जमीन हिसकावून अदानीसारख्या बड्या उद्योगपतींना भेट म्हणून दिली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -