राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होणार

Rahul Gandhi's security is under threat in Punjab

लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता असून, तशी माहिती काँग्रेसच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करत पत्र देखील पाठवली होती. अखेर राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्यास सहमती दाखवली असून, लवकरच ते सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.

१५ ऑगस्टनंतर राहुल गांधी होणार अध्यक्ष?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक असून, या बैठकीनंतर राहुल गांधी १५ ऑगस्टनंतर अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) व्हर्च्युअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली होती.