Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश श्रीनगरच्या लालचौकात नव्हे तर, काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी फडकावणार तिरंगा

श्रीनगरच्या लालचौकात नव्हे तर, काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी फडकावणार तिरंगा

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची सांगता श्रीनगर येथे येत्या 30 जानेवारी 2023 रोजी तिरंगा फडकावून होणार आहे. तथापि, तेथील लाल चौकात तिरंगा फडकावण्यात येणार नसून काँग्रेस मुख्यायलयात फडकावण्यात येणार असल्याचे जम्मू काश्मीर काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी आणि पक्षाच्या खासदार रजनी पाटील यांनी मंगळवारी सांगितले की, राहुल गांधी 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगर येथील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करून भारत जोडो यात्रेची समारोप केला जाईल. लाल चौकात ध्वजारोहण केला तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा ठरेल, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर 2022पासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ झाला. तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून ही यात्राला सुरू झाली. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये समारोप होईल, असे या यात्रेचा नियोजन करण्यात आले होते. या यात्रेत काँग्रेस पक्षाच्या झेंड्याऐवजी राष्ट्रध्वज फडकावण्याचेही ठरवले होते. आतापर्यंत ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधून गेली आहे.

- Advertisement -

पंजाबहून लखनपूरमार्गे ही भारत जो़डो यात्रा गुरुवारी सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल. तर, 23 जानेवारी रोजी ही यात्रा जम्मूत दाखल होणार आहे. जम्मूत राहुल गांधी यांची रॅली आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडे आम्ही परवानगी मागितली आहे. प्रशासन आम्हाला ही परवानगी देईल, असे आम्हाला वाटत असल्याचे खासदार रजनी पाटील म्हणाल्या.

लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर आमचा विश्वास नाही. त्यांनी तो तिथे आधी फडकवला आहे, असे सांगून खासदार रजनी पाटील म्हणाल्या की, यात्रेचा समारोपाचा मुख्य सोहळा श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे होणार आहे.

- Advertisment -