घरदेश-विदेशराहुल गांधी आज अमेरिकन तज्ज्ञांशी चर्चा करणार

राहुल गांधी आज अमेरिकन तज्ज्ञांशी चर्चा करणार

Subscribe

कोरोनाचा जगावर काय परिणाम झाला यावर संवाद साधणार आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी आज अमेरिकेचे माजी मुत्सद्दी निकोलस बर्न्स यांच्याशी सकाळी १० वाजता संवाद साधणार आहेत. राहुल गांधी कोरोना आणि लॉकडाऊन यावर अनेक तज्ज्ञांशी गेले काही दिवस चर्चा करत आहेत.

- Advertisement -

निकोलस बर्न्स कोण आहेत?

निकोलस बर्न्स सध्या हार्वर्डच्या जॉन एफ केनेडी विद्यालयात ‘प्रॅक्टिस ऑफ डिप्लोमसी आणि आंतरराष्ट्रीय राजकारण’ विभागात प्राध्यापक आहेत. बर्न्स हार्वर्ड केनेडी विद्यालयातील ‘फ्युचर ऑफ डिप्लोमसी प्रोजेक्ट’ चे संचालक आणि मध्य-पूर्व, भारत आणि दक्षिण आशिया कार्यक्रमांचे प्राध्यापक आहेत. राज्य विभागात त्यांच्या कारकीर्दीत ते अमेरिकेच्या राजकीय व्यवहार विभागाचे अवर सचिव होते. ते भारत-अमेरिका अणुकरारातील मुख्य वाटाघाटी करणारे होते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बर्‍याच तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. ज्यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, अभिजीत बॅनर्जी यांच्यासारख्या आर्थिक क्षेत्रातील मोठ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. या व्यतिरिक्त राहुल गांधी हार्वर्डच्या प्राध्यापकांशी यापूर्वीही बोलले आहेत. अलीकडेच त्यांनी व्यापारी राजीव बजाज यांच्याशीही संवाद साधला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -