Breaking News : राहुल गांधींची खासदारकी रद्द; मोदी आडनावाचे प्रकरण भोवले

मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का मिळाला आहे.

Rahul Gandhi's candidacy canceled

मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का मिळाला आहे. कोर्टाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजपाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन सुरत न्यायालयाने काल, गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तथापि, राहुल गांधी यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला आणि या निर्णयाविरुद्ध अपील करता यावे यासाठी त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 8 अन्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे. मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी बदनमीकारक वक्तव्य केले होते. याच प्रकरणी काल गुरुवारी (ता. 23 मार्च) सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी त्यांचा 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजुर करण्यात आला. पण कोर्टाने ही शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांची खासदारकी धोक्यात आली होती. तसेच खासदारकी अपात्रता या निर्णयानंतरच लागू करण्यात आलेली होती. यानुसार आज शुक्रवारी (ता. 24 मार्च) त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा लोकसभा सचिवालयाकडून करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


हेही वाचा – राहुल गांधींच्या आंदोलनावरून विरोधक-उपमुख्यमंत्री आमने सामने