घरदेश-विदेशखासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा निर्धार; म्हणाले, मी प्रश्न विचारतच राहणार!

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा निर्धार; म्हणाले, मी प्रश्न विचारतच राहणार!

Subscribe

Rahul Gandhi Reaction | अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधात बोललो. यांचं नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असल्यापासून मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावा आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Reaction | नवी दिल्ली – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांचं संसदेच सदस्यत्व रद्द केलं. त्यानंतर, राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. खासदारकी गेली असली तरीही राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाहीसाठी लढत राहणार असल्याचा निर्धार केला आहे. मी कोणालाही घाबरत नाही, मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत राहणार, प्रश्न विचारत राहणार, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती.

राहुल गांधी म्हणाले की, “मी तुमच्याशी खूप वेळा बोललो आहे की भारतात लोकशाहीवर आक्रमण होतंय. याची रोज नवनवे उदाहरणं मिळत आहेत. मी एकच प्रश्न विचारला होता. अदानींची शेल कंपनी आहे. त्यात २० हजार कोटी रुपये कोणीतरी गुंतवले, हा अदानींचा पैसा नाही. अदानींचा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय आहे. मग हे पैसे कोणाचे आहेत, हा प्रश्न मी विचारला होता. मी संसदेत याबाबत पुरावा सादर केला होता. अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधाबाबत बोललो. यांचं नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असल्यापासून मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावे आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? मोदींसोबत नातं काय? राहुल गांधींकडून सरबत्ती

“देशातील विमानतळ नियमांना बगल देऊन अदानींना देण्यात आले. याचा पुरावाही दिला. मी यासंदर्भात पत्र लिहिले. परंतु, काही फरक नाही पडला. मला खोट्यात पाडण्यासाठी मंत्र्यांनी माझ्याविरोधात अफवा पसरवली की मी परदेशी ताकदींकडून मदत मागितली. परंतु, संसदेचा नियम आहे. कोणत्याही सदस्यांवर आरोप लागला तर त्यांना उत्तर देण्याचा हक्क असतो. मी यासाठीही पत्र लिहिलं. पण, त्यांचं उत्तर नाही आलं. मग मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गेलो. मला बोलू देण्याची विनंती केली. पण, मला बोलू दिलं गेलं नाही. मी बोलायला देऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. नरेंद्र मोदींचं अदानींसोबत काय नातं आहे आणि २० हजार कोटी रुपये कसले आहेत हे मी विचारत राहणार, मला याचं काहीही वाटत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय. मी कोणालाही घाबरत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -