Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश राहुल गांधींचा नवा अवतार, टाय-कोट घालून वेगळ्या लूकमध्ये लंडनमध्ये दिसले

राहुल गांधींचा नवा अवतार, टाय-कोट घालून वेगळ्या लूकमध्ये लंडनमध्ये दिसले

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटेन दौऱ्यावर असून बऱ्याच दिवसांनी ते नवीन अवतारात दिसले. राहुल गांधी यांनी ट्रिम शेव्ह, तसेच टाय-कोट परिधान केला आहे. राहुल गांधी सध्या ब्रिटेनच्या केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत.

भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२२ला सुरुवात झाल्यानंतर राहुल गांधी यांनी केस आणि दाढी न कापताच अनेक राज्यांत पदयात्रा केली. वाढलेले केस आणि दाढी यामुळे राहुल गांधी वेगळेच दिसत होते. जानेवारीत या यात्रेच्या समारोपाला तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते तशाच रुपात दिसले. त्यांना या अवतारात लोकांनी कधीच पाहिले नव्हते. विरोधी नेत्यांनी तर त्यांच्या या लूकची तुलना इराकचा हुकूमशाह सद्दाम हुसेन यांच्याशी केली.

- Advertisement -

पण आता राहुल गांधी पुन्हा एकदा नव्या रुपात दिसत असून त्यांनी त्यांची दाढी ट्रिम केली आहे. त्यामुळे राहुल गांधींचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांनी याआधी कधीच दाढी-मिशी ठेवली नव्हती. सध्याच्या काळात दाढी आणि मिशी ठेवणे फॅशन झाली आहे. क्रिकेटर किंवा बॉलिवूड स्टार दाढी आणि मिशी लूकमध्येच जास्त दिसतात आणि या यादीत आता राहुल गांधींचाही समावेश झाला.

- Advertisement -

राहुल गांधी ७ दिवस ब्रिटेन दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केंब्रिज विद्यापीठात व्याख्यानाने होणार आहे. केंब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राहिलेले राहुल गांधी ‘लर्निंग टू लिसन इन द 21 सेंचुरी’ या विषयावर विद्यार्थांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते भारत आणि चीन या देशांच्या संबंधांवरही बोलणार आहेत.

केंद्र सरकारला लक्ष्य करताना सावरकरांवर टीका
अलीकडेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. भारत सरकारचे एक मंत्री म्हणतात (परराष्ट्रमंत्री एस जयशंकर), चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा शक्तीशाली आहे. त्यांच्यासोबत आपण कसे लढणार? इंग्रजांशी लढताना भारताची अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा मोठी होती का? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावकरकरांची विचारधारा आहे. जो कमकुवत आहे त्याच्यासोबत तुम्ही लढणार आणि जो बलाढ्य आहे त्यांच्यासमोर नतमस्तक होणार. याला नेभळटपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद आणि हीच का तुमची देशभक्ती, असा सवाल राहुल गांधींनी केला होता.

- Advertisment -