राहुल गांधींच्या सुरक्षेत कुचराई, 20 मिनिटे भलत्याच दिशेने जात राहिला ताफा

Rahul Gandhi's security is under threat in Punjab

काँग्रेस माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेमध्ये कुचराई झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या घरी राहुल गांधी भेट देण्यासाठी गेले जात होते. यावेळी त्यांचा ताफा तब्बल २० मिनिटे भलत्याच दिशेने जात राहिल्याचे समोर आली आहे. या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी सुरक्षेत कुचराई झाल्याचा मुद्दा समोर आला आहे.

काय घडले –

सिद्धू मुसेवालाच्या घरी त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर होते. संगरूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी चंदीगड विमानतळावरून निघालेला राहुल गांधींचा ताफा थेट अर्बन इस्टेट बायपास रूटवर गेल्याचे एका खासगी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. तब्बल २० मिनिटे राहुल गांधींचा ताफा या भागामध्ये फिरत होता. नेमका रस्ता न सापडल्यामुळे हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पतियाळा पोलिसांनी मध्यस्थी करून प्रसंगावधान राखत राहुल गांधींचा ताफा पुन्हा योग्य मार्गावर आणला आणि तिथून पुढे ते सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह राजा, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा, माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी आणि पक्षातील इतर नेतेमंडली आणि पदाधिकारी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतही झाली होती कुचराई –

याआधी पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी सुरक्षेत कुचराई झाल्याचा मुद्दा बराच चर्चेत राहिला होता. मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावर तब्बल २० मिनिटे खोळंबून राहिला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ताफा अडकून पडल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, यामुळे मोदींना तिथून माघारी फिरावे लागले होते.