Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'मोदी आडनाववाले सर्व चोर' हे राहुल गांधींचे विचारपूर्वक विधान, रवीशंकर प्रसाद यांची...

‘मोदी आडनाववाले सर्व चोर’ हे राहुल गांधींचे विचारपूर्वक विधान, रवीशंकर प्रसाद यांची टीका

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे संसदेच सदस्यत्वही रद्द केले. त्यानंतर, राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मी विचारपूर्वक बोलतो असे विधान केले होते. हाच धागा पकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

रवीशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेत खोट्या आणि निराधार विधानाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या स्वभावानुसार सर्व जनतेला फसवण्याचा प्रयत्न केले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर ते आज काहीच बोलले नाही. राहुल गांधी यांनी २०१९ च्या वेळी एका भाषणादरम्यान केलेल्या विधानामुळे त्यांना शिक्षा झाली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत एक विधान केले की, मी विचारपूर्वक बोलतो. म्हणजे २०१९ ला राहुल गांधी कर्नाटकातील सभेत जे बोलले ते विचारपूर्वक होते, असा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी बोलले होते की, सर्व मोदी आडनाववाले चोर आहेत. मोदी आडनाववाले बिहार, भारत, पश्चिम भारत आणि मागासलेल्या भागातून येतात. राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे या मागासवर्गीय लोकांचा अपमान झाला होता. राहुल गांधींना भर सभेत त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी अपशब्द वापरण्याचा अधिकार असेल तर पीडितांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयात पीडितांना वकिलामार्फत त्यांच्या बाजूने बोलण्याची संधीही देण्यात आली. न्यायालयाने राहुल गांधी माफी मागणार का असे विचारले, पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. याशिवाय राहुल गांधींवर मानहानीचे अजून सात खटले सुरू आहेत, असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जी शिक्षा झाली आहे त्याचा अदानीशी काहीही संबंध नाही. 2019 मध्ये त्यांनी मागासवर्गीयांचा भर सभेत अपमान केला. मोदी समाजातील लोकांनी ते वेदनादायक वाटले आणि त्यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली, असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
त्यांनी पत्रकार परिषदेत दोन मुद्दे मांडले. पहिला म्हणजे राहुल गांधी विचारपूर्वक बोलतात हे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुद्दाम मोदी समाजातील मागासलेल्या लोकांचा अपमान केला आहे, असे भाजपाचे मत आहे आणि भाजपा याचा निषेध करते. राहुल गांधींनी मागासवर्गीय लोकांचा अपमान केल्यामुळे भाजपा त्यांच्याविरुद्ध देशव्यापी आंदोलन करणार आहोत.

- Advertisement -

दुसरा मुद्दा गंभीर आहे, कारण ज्या सुरत कोर्टात राहुल गांधींना शिक्षा झाली त्या कोर्टात राहुल गांधींच्या बाजूने बोलण्यासाठी पक्षाच्या बाजूने मोठे मोठे वकील का नाही आले. हे वकील सुरतच्या जिल्हा न्यायालयात का गेले नाहीत आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात का गेले नाहीत? पवन खेरांनी मोदींना तुमची कबर खोदून काढेल आणि खूप काही ते बोलले होते. तेव्हा खेरांना दिल्ली विमानतळावर अडवण्यात आलं होते आणि त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा खेरांना सोडवण्यासाठी तासाभरात सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षाच्या वकीलांनी स्थगिती आणली होती. मग राहुल प्रकरणावर काँग्रेस सेना गप्प का होती? अशा प्रश्न रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.

रवीशंकर प्रसादर म्हणाले की, राहुल गांधी एकटे नाहीत की न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले आहे. न्यायालयाने भाजपच्या सहा जणांसह 32 जणांना अपात्र ठरवले आहे. यात अखिलेश यांच्या पक्षातील, काँग्रेस आणि बिहारमधील लालूप्रसाद यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. देशाचा कायदा असा आहे की तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा झाली तर तुम्ही लगेच अपात्र होणार. न्यायालय तुमच्या व्यवहारामुळे तुम्हाला स्थगिती देऊ शकत नाही. नीलेश थॉमसच्या प्रकरणातही असाच निकाल न्यायालयाने दिला होता.

राहुल गांधींच्या पक्षाने मोदी आडनाव प्रकरणात न्यायालयाकडून स्थगिती मिळवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला नाही असा भाजपाचा स्पष्ट आरोप आहे. कर्नाटकातील राहुलच्या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे असे संकेत त्याच्या बहिणीने तसेच इतरांनी दिले होते. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही विचारपूर्वक केलेली रणनीती होती. राहुल गांधींनी बलिदान दिले असे सांगून कर्नाटक निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला उठवायचा आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असून राहुल गांधींना काँग्रेसमधून बाहेर काढा आणि काँग्रेस वाचवा, असा प्रयत्न सुरू आहे, असेही रवीशंकर प्रसाद म्हणाले.

- Advertisment -