घरदेश-विदेशरायगड जिल्ह्यात हक्काच्या क्रीडांगणासाठी रायगड प्रीमियर लिग सरसावली

रायगड जिल्ह्यात हक्काच्या क्रीडांगणासाठी रायगड प्रीमियर लिग सरसावली

Subscribe

रायगड जिल्यात हक्काचे क्रीडांगण असावे व ते जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी रायगड प्रीमियर लिग संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. रायगड जिल्हा हा येणार्‍या काळात झपाट्याने विकासाकडे वाटचाल करत आहे. सिडकोनंतर आता एमएमआरडीए क्षेत्र म्हणून रायगडचा बाहुतांंश भाग घोषित झाला आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण, विमानतळ, महामार्ग ,स्मार्ट सिटीज, रेल्वे प्रोजेक्ट्सचा प्रस्ताव प्रगती पथावर आहे. मात्र रायगड जिल्ह्यात हक्कांचे क्रीडांगण अजूनही नाही. जी काही मोजकी क्रीडांगणे आहेत ती खाजगी कंपन्यांकडे आहेत. त्यात प्रामुख्याने रिलायन्स नागोठाणे,आरसीएफ कुरुळ, जेएनपीटी उरण, एनआयएसएम रसायनी, पेण नगरपालिका यांच्याकडे आहेत. रायगडच्या खेळाडूंना ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने क्रिकेट असोसिएशन,अकॅडमीज्, क्लब, क्रीडा मंडळे स्थापन झालेली आहेत. टेनिस क्रिकेटसह लेदर बॉल क्रिकेट सुद्धा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खेळले जाते.

प्रश्न आहे तो क्रीडांगणांचा, यासाठी रायगड प्रीमियर लिग संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन रायगड जिल्ह्यात हक्काचे क्रीडांगण असावे, यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे. याआधी राजेश पाटील यांनी रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाच्या प्रसंगी आपण लवकरच रायगड जिल्ह्यात हक्काचे क्रीडांगण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी आज रायगड जिल्ह्या महसूल विभागाचे अधिकारी सचिन शेजाळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली. यावेळी रायगड प्रीमियर लीगचे सचिव तथा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, आरपीएलचे कार्यकारणीचे सदस्य अ‍ॅड. प्रथमेश पाटील,अ‍ॅड.कौस्तुभ पुनकर, अ‍ॅड. पंकज पंडित,संदिप जोशी उपस्थित होते. लवकरच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राजेश पाटील म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -