घरदेश-विदेशरेल रोको आंदोलन: प्रवाशांना दूध आणि पाणी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सांगणार -...

रेल रोको आंदोलन: प्रवाशांना दूध आणि पाणी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सांगणार – राकेश टिकैत

Subscribe

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. हे आंदोलन अधिक तिव्र करण्यासाठी आज शेतकऱअयांनी देशभरात रेल रोको आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाला त्रास होणार नाही, असं सांगितलं. सर्व प्रवशांना दूध, पाणी देणार, तसंच त्यांना फुलं देऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना सांगणार, असं राकेश टिकैत म्हणाले. आज १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन असणार आहे. रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

राकेश टिकैत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल रोको आंदोलनाविषयी माहिती दिली. “ट्रेन सुरु कुठे आहेत? एक-दोन तर ट्रेन सुरु आहेत. याउल आम्ही सरकारला सांगणार आहोत की अजून ट्रेन सुरु करा. नागरिक त्रस्त आहेत. ८ महिन्यांपासून सरकारने ट्रेन थांबवल्या आहेत. जी ट्रेन येईल तिला थांबवून आम्ही प्रवाशांना पाणी प्यायला देणार, फुलं देणार आणि या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कोमत्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे, त्याची माहिती देणार,” असं राकेश टीकैत म्हणाले. ट्रेन थांबवल्यानंतर प्रवाशआंना त्रास होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना टिकैत म्हणाले, “कोण गैरवर्तन करेल? जो कोणी असं करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. रेल रोको आंदोलन शांततेत होईल. प्रवाशांना चणे, दूध आणि पाणी दिलं जाईल.”

- Advertisement -

रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनेही जय्यत तयारी केली आहे. रेल रोको आंदोलन शांततेत सुरु ठेवण्यासाठी स्पेशल फोर्सच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी रेल्वेने खबरदारी घेतली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -