Railway Budget 2023-24 : राजधानी, शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी आता ‘या’ ट्रेन धावणार?

अनेक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश सर्वसाधारण अर्थसंकल्पात केला जात आहे. नवीन गाड्या चालवण्यासंदर्भातही रेल्वेच्या अर्थसंकल्पात माहिती दिली जाते. तसेच, रेल्वे स्थानकांपासून ते नवीन गाड्यांपर्यंत अनेक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या जातात.

Railway Recruitment 2022: Looking for a job in Railways? Job opportunities for positions

अनेक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश सर्वसाधारण अर्थसंकल्पात केला जात आहे. नवीन गाड्या चालवण्यासंदर्भातही रेल्वेच्या अर्थसंकल्पात माहिती दिली जाते. तसेच, रेल्वे स्थानकांपासून ते नवीन गाड्यांपर्यंत अनेक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या जातात. त्याचप्रमाणे यंदाच्याही अर्थसंकल्पातून अनेक घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Railway Budget Rajdhani Shatabdi Express will now run this train)

वंदे भारत ट्रेनसाठी 1800 कोटी रुपयांची मंजूरी

वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर व्हर्जनसाठी रेल्वे बजेटमधून 1800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षांत या वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच असलेल्या ४०० गाड्या देशातील विविध मार्गांवर धावणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आयसीएफसह अनेक कंपन्यांनी या गाड्या बनवण्यासाठी पुढाकार दर्शवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 400 गाड्यांपैकी पहिल्या 200 चेअर कार ट्रेन असतील आणि बाकीच्या स्लीपर व्हर्जन असतील, असेही सांगितले जात आहे. तसेच, या गाड्या जास्तीत जास्त 180 किमी प्रतितास वेगाने धावण्याच्या दृष्टीने बवनल्या जात आहे. मात्र, या गाड्या 130 किमी प्रतितास वेगाने धावतील.

स्लीपर कोच असलेल्या गाड्यांचा कमाल वेग ताशी 220 किमी असेल

उर्वरित 200 गाड्यांमध्ये स्लीपर कोच असतील. त्या जास्तीत जास्त 220 किमी ताशी आणि 200 किमी प्रतितास या वेगाने धावण्यासाठी डिझाइन केल्या जातील. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन वर्षांत सर्व 400 ट्रेन देशातील विविध रेल्वे मार्गांवर धावण्यासाठी तयार होतील.

या गाड्या शताब्दी आणि राजधानी गाड्यांची जागा घेतील

ज्या वंदे भारत गाड्यांमध्ये आसनव्यवस्था आहेत, त्या गाड्या भविष्यात शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांची जागा घेतील. तसेच, ज्या गाड्यांध्ये स्लीपर कोच आहे, त्या गाड्या राजधानी एक्स्प्रेस गाड्यांची जागा घेतील. तसेच, या वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच असलेले डबे अॅल्युमिनियमचे बनवले जातील. जे ताशी 220 किलोमीटर वेगाने धावतील. मात्र, प्रवासासाठी ही स्लीपर ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस वंदे भारत गाड्या सुरू होतील. नवीन मार्गांमध्ये तेलंगणातील काचीगुडा ते कर्नाटकातील बेंगळुरू आणि तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि महाराष्ट्रातील पुणे यांचा समावेश आहे.

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशात आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. नागपूर-बिलासपूर, दिल्ली-वाराणसी, दिल्ली-कटरा, दिल्ली-उना, गांधीनगर-मुंबई, चेन्नई-म्हैसूर, हावडा-न्यू जलपायगुडी आणि सिकंदराबाद-विशाखापट्टणम या मार्गांवर ही धावत आहेत.


हेही वाचा – आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता ‘अल्लाह’चा भरवसा, पाक अर्थमंत्र्यांचे वक्तव्य