घरताज्या घडामोडीरेल्वे प्रवाशांसाठी मेन्यूकार्ड जारी, 'असे' आहेत दर; वाचा सविस्तर

रेल्वे प्रवाशांसाठी मेन्यूकार्ड जारी, ‘असे’ आहेत दर; वाचा सविस्तर

Subscribe

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाकडून अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असतात. प्रवासावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासन योग्यती खबरदारी घेत असते. अशातच प्रवासात प्रवाशांना भूक लागल्यास खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहे.

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाकडून अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असतात. प्रवासावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासन योग्यती खबरदारी घेत असते. अशातच प्रवासात प्रवाशांना भूक लागल्यास खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, या खाद्यपदार्थांच्या दरांवरून नेहमीच प्रवासी आणि रेल्वेच्या पॅन्ट्रीमधील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असतात. त्यामुळे या वादातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेने खाद्यपदार्थांच्या मेन्यूकार्डसह अद्ययावत दर यादी जारी केले आहेत. (railway food menu and tariff chicken momo at 80 and 2 chapati for 20 masala dosa dhokla price list)

रेल्वेने जारी केलेल्या दरांनुसार, जेवणातील खाद्यपदार्थांची सुरुवात केवळ 20 रुपयांपासून होते. 20 रुपयांमध्ये, रेल्वे तुम्हाला कचोरी, वडा, समोसा, सँडविच, गरम/थंड दूध असे नाश्त्याचे पदार्थ उपलब्ध करून देत आहेत. तसेच, मसाला डोसा, व्हेज बर्गर, चिकन/टोमॅटो सूप, पोहे आणि ढोकळा या पदार्थांसाठी प्रवाशांना आता केवळ 30 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

स्विटडीशमध्ये प्रवाशांसाठी अनेक पर्याय रेल्वेने उपलब्ध केले आहेत. त्यानुसार, जिलेबी, गुलाब जामुन आणि केसरची खीर निवडण्याचा पर्याय देत आहे. या तिघांची किंमत फक्त 20 रुपये आहे. तसेच, प्रवाशांना हलकं आणि निरोगी अन्न खायचं असल्यास उकडलेल्या भाज्या, ओट्स, कॉर्न फ्लेक्स आणि 2 अंडी ऑम्लेट आणि ब्रेडचा पर्याय उपलब्ध असून, केवळ 30 ते 50 रुपयांना मिळणार आहे.

त्याशिवाय, प्रवाशांना मसालेदार खायचे असल्यास आलू चाट, व्हेज/नॉन-व्हेज मोमोज, पालम पुरी आणि लिट्टी चोखा असे पदार्थ उपलब्ध आहेत. त्यावेळी, रेल्वे केवळ 100 रुपयांमध्ये भरपूर जेवण देत आहे. त्यात फिश कटलेट, चिकन करी, चिकन फ्राईड राईस यांचा समावेश आहे. एखादा प्रवाशी शाकाहारी असल्यास व्हेज पुलाव, दाल बाटी चुरमा आणि पनीर कडी असे पर्याय उपलब्ध आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार – आदित्य ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -