घरताज्या घडामोडीIndian railway new rules : रात्रीच्या ट्रेन प्रवासासाठी रेल्वेचे नवे नियम जारी,...

Indian railway new rules : रात्रीच्या ट्रेन प्रवासासाठी रेल्वेचे नवे नियम जारी, अन्यथा होऊ शकते कारवाई

Subscribe

ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी रेल्वेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवास सुखरूप होण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आनंदित व्हावा, यासाठी रेल्वेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना एखादा प्रवासी मोठ-मोठ्याने संगीत वाजवतो किंवा फोनवर मोठ्याने बोलत असतो. त्यावेळी इतर प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मात्र, आता रेल्वे प्रवाशांना अशा समास्यांना सामोरे जावे लागणार नाहीये. कारण रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना निर्देश जारी केले आहेत.

- Advertisement -

काय आहेत नवीन नियम?

ट्रेनमधून प्रवास करत असताना फोनवर मोठ्या आवाजात बोलणे किंवा गाणी ऐकण्यावर बंदी आहे.

- Advertisement -

ट्रेन प्रवासादरम्यान डब्यातील लाइट्स हे रात्री १० वाजेनंतर बंद करावेत. तसेच फक्त नाईट लाईट्स सुरू ठेवावे.

ग्रूपमध्ये किंवा सहकुटुंब प्रवास करणारे प्रवासी रात्रभर गप्पा मारू शकत नाहीत.

एखाद्या प्रवाशाला कुठला त्रास झाल्यास त्यासाठी ट्रेन स्टाफला जबाबदार ठरवले जाणार आहे.

ट्रेनमधील स्टाफ, रेल्वे पोलीस, तिकीट चेकर, कोच अटेंडन्स आणि कॅटरींग स्टाफने शांततेत काम करावे.

रेल्वे कर्मचारी ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना, अपंग आणि अविवाहित महिलांना तात्काळ मदत करतील.

दरम्यान, रेल्वेकडून एक विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये ऑनबोर्ड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रवाशांना नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फोनवर मोठ्या आवाजात न बोलणे आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणे टाळावे, अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे.

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार ट्रेनमधील प्रवाशांकडून तक्रारीचे निराकरण न झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. सर्व विभागीय मंडळांना रेल्वे मंत्रालयाने नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


हेही वाचा : National Girl Child Day 2022 : आज राष्ट्रीय बालिका दिन, काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -