घरदेश-विदेशराजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फटकारले

राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फटकारले

Subscribe

ओडिशातील ट्रेन अपगाताच्या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून वैष्णव यांना लक्ष करण्यात आलेले आहे. पण आता विरोधकांना अश्विनी वैष्णव यांनी प्रतित्युत्तर देत चपराक लगावली आहे.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या शनिवारी 288 झाली, तर जखमींचा आकडा ९००वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांमधील नेत्यांपासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून घटनेच्या काही वेळापासूनच वैष्णव यांना लक्ष करण्यात आलेले आहे. पण आता विरोधकांना अश्विनी वैष्णव यांनी प्रतित्युत्तर देत चपराक लगावली आहे.

हेही वाचा – Odisha Train Accident : नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंवर तर, निलेश राणेंचे पवारांवर शरसंधान

- Advertisement -

“ही राजकारण करण्याची वेळ नाही. बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून 15 ते 20 दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल,” असे म्हणत वैष्णव यांनी राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना सुनावले आहे. अश्विनी वैष्णव हे गेल्या काही तासांपासून घटनास्थळावर असून त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांसोबत मिळून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातात जखमी आणि मृत्यू पावलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी रात्रीच मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. कमिशनर रेल्वे कमिटीलाही बोलावण्यात आले आहे. तेही चौकशी करतील. हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली जाईल. आता सर्व फोकस बचाव करण्यावर आहे. या अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना चांगल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्या रुग्णांची माहिती पोहचवली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांच्या उपस्थितीतच ओडिशा रेल्वे अपघाताबाबत (Odisha train accident) मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. कोरोमंडल ही सर्वात उत्तम एक्स्प्रेस ट्रेनपैकी एक आहे. मी तीनदा रेल्वेमंत्रीपदावर होते. त्या अनुभवावरून सांगते की, मी हा जो अपघात पाहिला आहे त्यावरून असे वाटते की, 21व्या शतकातील हा सर्वात मोठा रेल्वेअपघात आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत या दुर्घटनेची चौकशी करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -