घरदेश-विदेशकेंद्रात दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी; रेल्वे मंत्र्यांचा दावा

केंद्रात दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी; रेल्वे मंत्र्यांचा दावा

Subscribe

केंद्र सरकारमध्ये दर महिन्याला सुमारे 16 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी केला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने अजमेरमध्ये रोजगार मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वैष्णव बोलत होते. यावेळी वैष्णव आपल्या भाषणात म्हणाले की, या सरकारमध्ये दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि पारदर्शकता ही मोदी सरकारची गुरुकिल्ली आहे’. (railway minister claims center is providing 16 lakh jobs everyday said life of every class has becomes easier)

जगभरात आर्थिक संकट असतानाही, भारत शक्यतांनी परिपूर्ण असा एक उर्जा स्त्रोत म्हणून उदयास आला आहे, मोदी सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सुकर झाले आहे, यावेळी ‘राष्ट्र प्रथम सदैव प्रथम’ हा मंत्र तरुणांना अंगीकारण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, जीवनात तेच लोक जिंकतात ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले.

- Advertisement -

यावेळी तरुणांना भेडसावणाऱ्या शंका आणि इतर आव्हानांचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की, “राष्ट्र प्रथम नेहमी प्रथम हा मंत्र त्यांनी आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाहीत.

वैष्णव पुढे म्हणाले की, जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अनेक उदाहरणे घेता येतील, परंतु केवळ तेच लोक पुढे गेले, त्यांनाच समाधान आणि विजय मिळाला ज्यांनी आपल्या कर्तव्यात देशाला प्रथम स्थान दिले. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधानांनी कर्मयोगी इंडक्शन मॉड्युल लाँच केले जे सर्व नवीन भरतीसाठी एक ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे.


नाशिक, पालघर भूकंपाने हादरले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -