आतापर्यंत ४५ लाख श्रमिक गावी परतले, ८०% यूपी-बिहारचे – रेल्वे मंत्रालय!

railway station

लॉकडाऊन दरम्यान शनिवारी रेल्वेने प्रवासी आणि प्रवासी मजुरांच्या वाहतुकीविषयी माहिती दिली. लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने आतापर्यंत ४५ लाख लाख श्रमिकांना गावी सोडल्या रेल्वेने म्हटलं आहे. त्यापैकी ८० टक्के उत्तर प्रदेश आणि बिहारमधील होते. येत्या १० दिवसांत २ हजार ६०० गाड्यांमधून ३६ लाख प्रवासी प्रवास करतील, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी सांगितलं. रेल्वेने सांगितलं की आम्ही २७ मार्च रोजी प्रवासी कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्या संदर्भात एक निर्देश देखील जारी केला होता. यामध्ये ट्रक किंवा इतर मार्गाने परप्रांतीयांचा अवैध प्रवास रोखण्यासंदर्भात म्हटलं होतं.

आर्थिक गतीविधी वाढविण्यासाठी जूनपासून आणखी २०० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार बांधवांना बुकिंग करता येत नसल्याची तक्रार होती, त्यामुळे तिकिट काउंटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासी कामगारांसाठी चालविण्यात येणार्‍या गाड्या राज्य सरकारच्या समन्वयाने चालवण्यात येत आहेत. गरज लागल्यास, १० दिवसांनंतरही गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केलं जाईल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारांनी मिळून पुढील १० दिवसांचे वेळापत्रक तयार केले असून २६०० गाड्या चालवल्या जातील. यात ३६ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. कोणत्याही स्थानकावरून जास्तीत जास्त परप्रांतीयांना त्यांच्या घरी जायचं असेल तर त्यांच्यासाठीही रेल्वे सेवा दिली जाईल.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव म्हणाले, १ मेपासून प्रवासी मजुरांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या घरी नेलं जात आहे. त्यांना ट्रेनमध्ये मोफत अन्न आणि पाणी दिलं जात आहे. यावेळी, सामाजिक अंतर आणि इतर खबरदारीच्या उपायांची काळजी घेतली जात आहे. त्यांनी सांगितले की आज दररोज २०० हून अधिक कामगार गाड्या धावत आहेत. सर्व बुकिंग काउंटर उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत १००० काउंटर उघडण्यात आले आहेत. तसेच ६००० रेल्वे स्थानकांवर रेल्वे स्टॉल्स सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. कोविड केअर सेंटरसाठी आम्ही पाच हजार डब्बे तयार केले होते. यात ८० हजार बेड्स आहेत. १७ रेल्वे रूग्णालय फक्त कोविड रूग्णांसाठीच तयार केलेले आहेत. यात ५००० बेड आहेत. कोविड केअर ब्लॉक ३३ रुग्णालयांमध्ये बांधलं गेलं आहे.