घरताज्या घडामोडीउद्यापासून स्टेशनच्या काउंटरवरही करता येणार तिकिट बुकिंग

उद्यापासून स्टेशनच्या काउंटरवरही करता येणार तिकिट बुकिंग

Subscribe

लॉकडाऊन काळात विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. या ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बुक करावं लागत होतं. पण आता रेल्वे स्टेशन काऊंटरमधूनही तिकिटे बुक करता येणार आहे.

कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन लागू आहे. तथापि, आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी रेल्वेने स्थानकांवरील काउंटरवर तिकिट बुकिंगची सुविधादेखील बंद केली होती. दरम्यान, आता विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. या ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बुक करावं लागत होतं. पण आता रेल्वे स्टेशन काऊंटरमधूनही तिकिटे बुक करता येतील असा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

order_052120093207.png

- Advertisement -

- Advertisement -

शुक्रवारपासून रेल्वे स्थानकांच्या काउंटरवर प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे. रेल्वेच्या निवेदनानुसार, प्रवासी आरक्षित प्रवासासाठी स्टेशन, रेल्वे परिसरातील काउंटरवरुन तिकिटे बुक करू शकतील. तिकिटांच्या बुकींग दरम्यान, सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी क्षेत्रीय रेल्वेवर असेल.

यापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, लवकरच रेल्वे स्टेशनच्या काऊंटरमधून सामान्य लोकांना तिकिटे मिळतील. यासाठी रेल्वे विभागाचे पथक सर्व सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेत आहे. सर्व व्यवस्था केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी तिकिट काउंटर उघडले जातील. रेल्वेमंत्र्यांनी अशी आशा व्यक्त केली की येत्या १-२ दिवसात काउंटरवरून तिकिट खरेदीची सेवा पूर्ववत होऊ शकेल.

१ जूनपासून धावणाऱ्या गाड्यांचे बुकिंग गुरुवारपासून सुरू

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने १ जूनपासून २०० प्रवासी गाड्या चालवण्याची घोषणा केली. या गाड्यांचे बुकिंग गुरुवारी म्हणजेच आज सकाळी १० वाजता सुरू झालं. एसी स्पेशल आणि श्रमिक स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त रेल्वेने या २०० गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये सामान्य बोगींसाठी तिकिटेही बुक करता येतील. कन्फर्म तिकिटाशिवाय या गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.


हेही वाचा – CycloneAmphan: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बंगालला भेट देणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -