घरदेश-विदेशरेल्वेगाड्यांचे गुरांपासून होणार संरक्षण, रेल्वे मंत्रालय करणार उपाययोजना

रेल्वेगाड्यांचे गुरांपासून होणार संरक्षण, रेल्वे मंत्रालय करणार उपाययोजना

Subscribe

नवी दिल्ली : गुराढोरांमुळे होणारे रेल्वेगाड्यांचे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. असे अपघात घडू नयेत म्हणून विशेष प्रकारच्या बाऊंड्री वॉल परवानगी देण्यात आली आहे. आम्ही दोन डिझाइनवर विचार करीत असून त्यापैकी एका डिझाइनची भिंत येत्या 5 ते 6 महिन्यांत रुळालगत उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अलीकडच्या काळात वंदे भारत गाडीला एकामागून एक असे अपघात झाल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई अहमदाबाद प्रवास सुकर आणि सहज करणारी वंदे भारत एक्स्प्रेस 1 ऑक्टोबर रोजी लॉन्च झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला. परंतु अल्पावधीतच या एक्स्प्रेसच्या अपघाताच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या एक्स्प्रेसचे लागोपाठ तीन अपघात घडले. रेल्वेरुळांवर गुरे येत असल्याने हे अपघात घडल्याचे उघड झाले. त्यात गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. अशा घटना केवळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या बाबतीत घडलेल्या नाहीत, इतर गाड्यांचेही विविध ठिकाणी असे अपघात झाले आहेत.

- Advertisement -

हायस्पीड वंदे भारत ट्रेन 7 ऑक्टोबर 2022 रोजी गायीला धडकली होती. गांधीनगरहून मुंबईला जाणाऱ्या या ट्रेनचा वडोदरा विभागातील आणंदजवळ अपघात झाला होता. त्यानंतर 29 ऑक्टोबरला पुन्हा या गाडीचा अपघात झाला. ही गाडी मुंबईहून गांधीनगरला जात असताना वलसाड येथे हा अपघात झाला होता.

या घटनांवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली होती. रुळांवर गुरांची टक्कर होणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेनची रचना करताना हा मुद्दा लक्षात ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी गुरांसोबत होणारे अपघात रोखण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार येत्या 5 ते 6 महिन्यांत रुळालगत नव्या डिझाइनच्या भिंती उभारण्यात येतील. हा उपाय प्रभावी ठरला तर, ज्या भागात गुरांच्या अपघातांच्या जास्त घटना घडतात, अशा भागांत पुढील सहा महिन्यांत 1,000 किमीपर्यंत अशा भिंती बांधेल, असे वैष्णव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -