घरCORONA UPDATEलॉकडाऊन वाढल्याने रेल्वे मंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे मंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Subscribe

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून देशातील सर्व रेल्वे या ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलेल्या भाषणात याची घोषणा केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याचा कालावधी आज, १४ एप्रिल रोजी संपला असून आता पुन्हा २० दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाकडून देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून देशातील सर्व रेल्वे या ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

आरक्षण रद्द होणार

एप्रिल – मे महिन्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणात लोक गावाकडे जातात. त्यामुळे या दरम्यान, तिकिटी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बरेच लोक चार महिने आधीच तिकीट बुकिंग करतात. परंतु, आता देशात येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने आता कुठेही जाता येणार नाही.

- Advertisement -

दरम्यान, या काळात प्रवाशांनी आरक्षण करुन ठेवले असल्यास ते रद्द होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यासोबतच लॉकडाऊनमुळे आता तीन मेपर्यंत कोणत्याही प्रकारचे आरक्षित किंवा अनारक्षित तिकीट या कालावधीत उपलब्ध होणार नाही. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात किंवा अन्य ठिकाणचे तिकीट काऊंटर या कालावधीत बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजेच भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची वाहतूक मात्र, सुरु राहणार आहे.


हेही वाचा – कुणालाही नोकरीवरून काढू नका; वाचा मोदींनी सांगितलेल्या ७ सूचना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -