गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात, एक डब्बा घसरल्याने 50 हून अधिक प्रवासी जखमी

raipur to nagpur bhagat ki kothi train accident in gondia 15 passengers injured

गोंदिया :  गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रायपुरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी ट्रेनला हा अपघात झाला आहे. यात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी प्रवाश्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. ही घटना आज पहाटे 1 वाजता घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समोरून जात असताना मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात 53 प्रवासी किरकोळ तर 13 जणांना थोडा मार लागल्याची माहिती आहे. हा अपघात रात्री उशिरा अडीचच्या सुमारास घडला. गोंदियादरम्यान मालगाडीला ट्रेनला सिग्नल न मिळाल्याने मागून  ‘भगत की कोठी’ या पॅसेंजर ट्रेनने जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. यात सुदैवाने एकाही प्रवाशाचा मृत झालेला नाही. ही अपघातग्रस्त ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती.

जखमी प्रवाशांना गोंदिया जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री ही घटना घडली. घटनेत हिरवा सिग्नल मिळताच भगत की कोठी गाडी पुढे जात होती, मात्र तिच्या पुढील मालगाडी सिग्नल न मिळाल्याने रुळावरचं उभी होती. त्यामुळे भगत की कोठी गाडीने मालगाडीला मागून धडक दिली आणि हा अपघात झाला. या दोन्ही गाड्या एकाच दिशेने म्हणजेच नागपूरच्या दिशेने जात होत्या.