घरदेश-विदेश'जय श्री राम'च्या घोषणा देत उत्तर प्रदेशात शौचालयाची तोडफोड

‘जय श्री राम’च्या घोषणा देत उत्तर प्रदेशात शौचालयाची तोडफोड

Subscribe

उत्तर प्रदेशातील बजरंग दल कार्यकर्त्यांकडून शौचालयाच्या इमारतीचे कार्यकर्त्यांनी मोठे नुकसान केले आहे.

उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत शौचालय इमारतीची तोडफोड केली आहे. सरकारी बस स्थानकाजवळअसलेल्या शौचालयाच्या इमारतीची तोडफोड करत कार्यकर्त्यांनी मोठे नुकसान केले आहे. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हे शौचालय मंदिराला अगदी खेटून होते. ४० वर्षे जुने शौचालय मंदिरापासून फूटाच्या अंतरावर असून यामधून एक छोटी गल्ली जाते. परंतु या शौचलयजवळच असणाऱ्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. आणि तेथे गर्दी करत असतात. या शौचालयाला नुकतेच अत्याधुनिक स्वरुप देण्यात आले होते. असे ते म्हणाले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

बुधवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. मोठ मोठ्याने ‘जय श्री राम’, ‘एक ही नारा एक ही नाम- जय श्री राम जय श्री राम’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हातोडा, बांबूने शौचालय पाडण्यास सुरुवात केली.  महिला आणि दिव्यागांसाठी तयार करण्यात आलेल्या या शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे. अखिल पश्चिम युपीमध्ये स्वत;ला भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून घेणारे विष सिंह कंबोज यांनी शौचालय तोडफोडीची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, दोन दिवसापूर्वी आमच्या हिंदू योद्धांनी ४८ तासात हे शौचालय पाडण्याची मागणी केली होते. परंतु यावर दोन्ही दिवसात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर आम्ही हे शौचालय पाडण्याचा निर्णय घेत कारवाई सुरु केली. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून सुरु असलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा ऐकून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी उपस्थित  सफाई सुपरवायझर विमला यांनी सांगितले, हे शौचालय ४० वर्ष जुने असून मंदिर तयार करण्याच्या आधीपासून शौचालय या ठिकाणी होते. मंदिर आणि शौचलयामधून एक नाला वाहतो. यावेळी आम्ही शौचालय इमारत पाडताना कार्यकर्त्यांना विरोध केला परंतु ते ऐकले नाहीत. शौचालय इमारत पाडल्यामुळे आता महिला, लहान मुले, दिव्यांगांची मोठी गैरसोय होणार आहे. कारण परिसरात हे एकमेव मोठे शौचालय होते. तुम्ही सांगा आता या महिला कुठे जातील?  सहारनपुरचे एसपी सिटी विनीत भटनागर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, रोडवेजच्या लोकांच्या माहितीनुसार, हे शौचालय खूप जुने असून नुकतेच नुतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ज्या लोकांनी या शौचालयाची तोडफोड केली त्यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई केली जाईल.


हेही वाचा – प्रसिद्ध सोने व्यापारी पु. ना. गाडगीळ यांना कोटींचा गंडा 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -