घरदेश-विदेशLoudspeaker Row : लाऊडस्पीकर वादात आता लालूप्रसाद यादव यांची उडी, म्हणाले...

Loudspeaker Row : लाऊडस्पीकर वादात आता लालूप्रसाद यादव यांची उडी, म्हणाले…

Subscribe

चारा घोटाळा प्रकरणातील दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (RJD)) सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना अलीकडेट जामीन मंजुर झाला. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र बुधवारी सायंकाळी त्यांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लालूंना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच लालूप्रसाद प्रसाद यादव यांनी देशात सुरु असलेल्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालीसा वादात उडी घेतली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिथावणी चुकीची असल्याचे म्हटले आहे.

लाऊडस्पीकरच्या वादावर लालूप्रसाद यादव म्हणाले की, हे सर्व अत्यंत चुकीचे आहे. आपल्या देशाचे तुकडे- तुकडे करण्याचा हा प्रकार आहे. तुम्ही मशिदीजवळ का जात आहेत? हनुमान चालीसा वाचायची असेल तर मंदिरात जा… असंही त्यांनी स्पष्ट केले. या हिंदु- मुस्लिम वादातून देशात दंगल घडवण्याचा प्रकार सुरु आहे आणि हे देशासाठी अत्यंत घातक आहे. असही ते म्हणाले. यावेळी लालू प्रसाद यादव यांनी नितीश-तेजस्वी यांच्या युतीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षाध्यक्ष आहे, मी निर्णय घेईन, असं त्यांनी स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

दरम्यान लालूप्रसाद यादव यांनी आपल्या तब्येतीबाबत सांगताना म्हणाले की, डॉक्टरांनी मला थोडा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आठवडाभरानंतर मी पाटणाला जाईन, असं ते म्हणाले. दरम्यान देशातीलसध्याच्या राजकीय मुद्द्यांवरही लालू यादव नेहमी खुलेपणानं चर्चा करताना दिसतात.

‘केवळ मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई?’: राज ठाकरे

- Advertisement -

मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांना पुन्हा मशीदीवरील भोंगे आणि अजानवर वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या माहितीनुसार, मुंबईत 1,140 हून अधिक मशिदी आहेत. यापैकी 135 मशिदींनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून पहाटे 5 वाजता अजान दिली जाते. त्यामुळे मला विचारायचे आहे, पोलिसांनी या मशिदींवर काय कारवाई करणार की आमच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई केली पाहिजे?


Loudspeaker Row : मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरुंचा मोठा निर्णय: लाऊडस्पीकरशिवाय होणार पहाटेची अजान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -