Live Update : हिंदु धर्मात कोणी रोज भोंगे लावत नाही- चंद्रकांत पाटील 

Maharashtra Election weather update uddhav thackeray devendra fadnavis bjp shivsena congress ncp mumbai pune Gyanvapi Masjid
Maharashtra Election weather update uddhav thackeray devendra fadnavis bjp shivsena congress ncp mumbai pune Gyanvapi Masjid

हिंदु धर्मात कोणी रोज भोंगे लावत नाही- चंद्रकांत पाटील


ओबीसी आरक्षण हा फक्त भाजपचा विषय नाही- पंकज मुंडे


भोंगे उतरवा नाही तर आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंचा इशारा

आमच्या सणांना 10 ते 2 दिवसांची परवानगी देणार यांना 365 दिवसांची परवानगी कशी काय देता? राज ठाकरेंचा पोलिसांना सवाल

लोकांना त्रास कमी होईल अशी अपेक्षा, मुंबईतील बहुतांश मशिदी अनधिकृत – राज ठाकरे

मनसैनिकांची धरपकड कशासाठी? – राज ठाकरे

कायद्याचे पालन करूनही आम्हाला नोटीस का? राज ठाकरेंचा सवाल


खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर


मनसेच्या संदीप देशपांडे पोलिसांच्या हातात तुरी देऊन पळाले


मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 वाजता घेणार पत्रकार परिषद


पुण्यातील खालकर हनुमान मंदिरात मनसैनिकांकडून महाआरती


राज ठाकरे भाजपचं उपवस्त्र, मनसेला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री बोगस; राऊतांची टीका


शरद पवार आणि मविआ नेत्यांची थोड्याच वेळात बैठक, मविआचे अनेक वरिष्ठ नेते राहणार बैठकीला उपस्थित


खासदार नवनीत राणा यांची तब्येत बिघडली, उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात केले दाखल


डीसीपींकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थान परिसराची पाहणी, राज ठाकरेंच्या घराबाहेर बॅरिकेटिंग


भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यभरातील मनसैनिक आक्रमक

नाशिक, मुंबई, औरंगाबादसह राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून मशीदीबाहेर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड, राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा


राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता

लाऊडस्पीकरवरून अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सांगली न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये राड ठाकरेंच्या सभेच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे बीएमसीने त्यांना नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे.