घरदेश-विदेशकॉंग्रेसच्या खासदार रजनी पाटलांचे निलंबन; असे काय घडले?

कॉंग्रेसच्या खासदार रजनी पाटलांचे निलंबन; असे काय घडले?

Subscribe

गुरुवारी संसदेतील कामकाजाचा व्हिडिओ रजनी पाटील यांनी सोशल मिडियावर टाकला. ही कृती हानिकारकर आहे. त्यामुळे संसदेची विशेषाधिकार समिती याची चौकशी करेल. बाहेरील अन्य कोणतीही तपास यंत्रणा याची चौकशी करणार नाही. मात्र हे सत्र संपेपर्यंत रजनी पाटील यांना निलंबित केले जात आहे, असे उप राष्ट्रपती धनकड यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्लीः संसदीय गैरवर्तनाचा ठपका ठेवत उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांनी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी अशोकराव पाटील यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते निलंबन केले. रजनी पाटील ह्या खासदार सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत भाषण करत असताना विरोधका आक्रमक झाले होते. पंतप्रधान मोदी यांना विरोधक बोलू देत नव्हते. रजनी पाटील यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला. याची गंभीर दखल घेत उप राष्ट्रपती धनकड यांनी रजनी पाटील यांचे निलंबन केले. शुक्रवारी याची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

गुरुवारी संसदेतील कामकाजाचा व्हिडिओ रजनी पाटील यांनी सोशल मिडियावर टाकला. ही कृती हानिकारकर आहे. त्यामुळे संसदेची विशेषाधिकार समिती याची चौकशी करेल. बाहेरील अन्य कोणतीही तपास यंत्रणा याची चौकशी करणार नाही. मात्र हे सत्र संपेपर्यंत रजनी पाटील यांना निलंबित केले जात आहे, असे उप राष्ट्रपती धनकड यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांच्या अगदी विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. त्या बीडमधून लोकसभेत निवडून गेल्या होत्या. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांचे नाव त्यांच्या जागी चर्चेत होते. पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक शर्यतीत होते. मात्र रजनी पाटील यांना संधी मिळाली. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. तरीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी पक्षात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे रजनी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -

बिनविरोध निवडणूक जिंकल्यानंतर रजनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले होते.  आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला, दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन मला ही संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -