घरदेश-विदेशकोरोनावर मात करणं 'या' गावाकडून शिकावं! गावकरी मतदानाला जावं तसं लसीकरणाला गेलेत,...

कोरोनावर मात करणं ‘या’ गावाकडून शिकावं! गावकरी मतदानाला जावं तसं लसीकरणाला गेलेत, एकही बाधित रूग्ण नाही

Subscribe

जगभरात कोरोनाने कहर केले असून देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देश व्यापून टाकला आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना बाधित रूग्ण संख्येमुळे प्रशासन देखील चिंतेत आहे. परंतु असं एक गाव आहे. ज्या गावाने कोरोनाला हरवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आणि त्या गावात सध्या एकही बाधित रूग्ण नसल्याचे सांगितले जात आहे. ते गाव म्हणजे राजस्थान मधील अलवर येथील बनसूर. बनसूर येथील ९ ग्रामपंचायतीची कहाणी वेगळी आहे. या खेड्यांमध्ये एकाही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनासंदर्भातील केलेली जनजागृती. निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे काळजीपूर्वक नेले जाते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला लसीकरणासाठी त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये नेले गेते. याचा परिणाम म्हणजे सर्वाधिक लोकांना लस दिली गेली. यामध्ये ४५ वर्षांहून अधिक असणाऱ्या ९० % पेक्षा जास्त व्यक्तीचे लसीकरण केले गेले आहे.

दूसऱ्या लाटेत ६० बालकांचा जन्म

राजस्थानमधील या ९ ग्रामपंचायतींच्या ३० पेक्षा अधिक गावात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ६० मुले जन्माला आली असून तेथे १२० पेक्षा जास्त गर्भवती महिला आहेत. त्या दरम्यान त्यांना रुग्णालयातही जावे लागले. येथील कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. कारण या गावांमध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या लोकांचे लसीकरण प्राधान्याने केले गेले.

- Advertisement -

या ग्रामपंचायतीत एकही बाधित नाही

देवसन, छिंद, चुला, इंद्राडा, किशोरपुरा, मांची, रसनाली, बसदयाल आणि तुराणा. या ग्रामपंचायतींमध्ये जवळपास ३३ गावांचा समावेश आहेत. अकेली रसनाली ग्रामपंचायतीमध्ये १ एप्रिल ते २ जून दरम्यान १२ मुलांचा जन्म झाला. तर या ग्रामपंचायतीत ३८ गर्भवती महिला आहेत.

दररोज ६०० अँटीजेन किट्सद्वारे चाचणी

या खेड्यांमध्ये अँटीजेन किटचा वापर करून देखील कोरोना चाचणी घेतली जात आहे. एकट्या देवसनमध्ये ५० पेक्षा अधिक लोकांवर अँटीजेन किट्सद्वारे चाचणी घेण्यात आली आहे. संपूर्ण बानसूरमध्ये दररोज साधारण ६०० नमुन्यांच्या अँटीजेन किटसह कोरोनाची तपासणी केली जात आहे. याआधीही, बानसूरमधील कोरोना तपासणी इतर गावांपेक्षा अधिक केली गेली आहे. अकेली ग्रामपंचायत देवसनची लोकसंख्या साधारण पाच हजार आहे. यापैकी ८९१ लोकांना कोरोना लस मिळाली आहे. हे सर्व ४५ पेक्षा जास्त वयाचे लोक आहेत. खटोटी देवसन गावातच येते. या गावात ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांना १०० % लस देण्यात आली आहे. तर, देवसनमधील सुमारे ९७ % लोकांचे लसीकरण झाले आहे. इतर ८ ग्रामपंचायतींची लोकसंख्या साधारण ४० हजार आहे. तेथेही सुमारे ९०% लसीकरण केले गेले आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -