देशात सध्या ५ राज्यात निवडणूकीचा माहोल आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. पैकी राजस्थान विधानसभा निवडणूकीत मजेशीर बाब समोर आली आहे.
राज्यस्थान विधानसभा निवडणुकीचा उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष आमने सामने आहेत.
मात्र, या निवडणूकीत दोनही पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात नवीन माहिती समोर आली आहे.
उमेदवारांनी शपथपत्रात परिवाराची माहिती आणि संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये मेवाड वागड भागातील 28 पैकी 6 जागेवर 7 उमेदवारांनी त्यांना दोन बायका असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार असे आहेत. ज्यांना 5 पेक्षा जास्त मुलं आहेत.
दोन बायका असलेले उमेदवार कोण?
उदयपूरच्या वल्लभनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयलाल डांगी यांना 2 पत्नी आहेत, तर खेरवाडा येथील काँग्रेसचे उमेदवार दयाराम परमार आणि झडोल येथील काँग्रेसचे उमेदवार हिरालाल दरंगी यांनाही प्रत्येकी २ पत्नी आहेत. प्रतापगडमध्येही भाजपचे हेमंत मीणा आणि काँग्रेसचे रामलाल मीणा यांनीही उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात याचा उल्लेख केला आहे.
बांसवाडा जिल्ह्यातील गढी येथील भाजपचे उमेदवार कैलाशचंद मीना आणि घाटोल येथील काँग्रेसचे उमेदवार नानालाल निनामा यांनाही 2 पत्नी आहेत.
बहुतांश आदिवासी समुदायामध्ये बहुपत्नीत्व अजूनही प्रचलित आहे. इथे काही लोकांना 2 तर काहींना 3 बायका असणे सामान्य बाब आहे.
खासदारालाही आहेत दोन बायका…
उदयपूरचे खासदार अर्जुनलाल मीना 2 पत्नी आहेत. करवा चौथच्या वेळी अर्जुनलालचा चेहरा पाहून त्यांच्या दोन्ही पत्नींनी उपवास सोडला. गेल्या वर्षी त्यांचा असाच एक फोटो समोर आला होता. ज्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. खासदाराच्या पत्नी मीनाक्षी आणि राजकुमारी या बहिणी आहेत. दोघीही आनंदाने एकत्र राहतात. राजकुमारी या सरकारी शिक्षिका आहेत, तर मीनाक्षीच्या नावावर गॅस एजन्सी आहे.
उदयपूरचे खासदार अर्जुनलाल मीणा यांनाही दोन पत्नी आहेत. करवा चौथ पूजेच्या वेळी अर्जुनलालचा चेहरा एकत्र पाहून दोन्ही पत्नींनी उपवास सोडला. गेल्या वर्षी त्यांचा असाच एक फोटो समोर आला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. खासदाराच्या पत्नी मीनाक्षी आणि राजकुमारी या बहिणी आहेत. दोघेही आनंदाने एकत्र राहतात. राजकुमारी या सरकारी शिक्षिका आहेत, तर मीनाक्षीच्या नावावर गॅस एजन्सी आहे.