Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश हे काय? मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प सादर करू लागले; जेव्हा मंत्र्यांनी कानात सांगितलं...

हे काय? मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प सादर करू लागले; जेव्हा मंत्र्यांनी कानात सांगितलं तेव्हा….

Subscribe

मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचून दाखवत होते, हे कसं कळलं? याचा अर्थ अर्थसंकल्प लीक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेत चालू कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच एक मोठी चूक समोर आली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली. हे लक्षात आल्यानंतर पीएचडी मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात अर्थसंकल्पाचे वाचन थांबवण्यास सांगितले. यावेळी विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचून दाखवत होते, हे कसं कळलं? याचा अर्थ अर्थसंकल्प लीक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

बचत आणि दिलासा देणारा अर्थसंकल्प जाहीर करून विधानसभेत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरूवातीला जेव्हा २-३ परिच्छेद वाचले, तेवढ्यात त्यांच्या मागे बसलेले मंत्री महेश जोशी जागेवरून उठतात. ते मागे कुठेतरी जातात आणि लगेच येऊन मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी कुजबूज करतात. त्यानंतर गेहलोत यांनी आपलं भाषण थांबवलं. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अर्थसंकल्पावरील तारीख पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला. मात्र, नंतर ते स्वतःच हसायला लागले. हे पाहून विधानसभेतील विरोधकांनी मात्र गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा विधानसभेत जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवण्यात आले. प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव उषा शर्मा यांना बोलावून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. “अर्थसंकल्पीय भाषणाच्या या प्रतीमध्ये काही फरक असेल तर सांगा. चुकून जास्तीचे पान मिळाले. मी एक पृष्ठ चुकीचे वाचले. लीक झाल्याचा प्रश्न येतोच कुठे?” असं अशोक गेहलोत म्हणाले.


विरोधकांच्या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी मी सभागृह सोडणार असल्याचं सांगितलं. मात्र हा गदारोळ पाहून राजस्थान विधानसभेचं कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -