घरदेश-विदेशRajasthan : मुलीचे जिवंतपणीच श्राद्ध, ओळखण्यास वडिलांचा नकार...

Rajasthan : मुलीचे जिवंतपणीच श्राद्ध, ओळखण्यास वडिलांचा नकार…

Subscribe

उदयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलीचे जिवंतपणीच श्राद्ध घालण्याचे ठरविले आणि त्याची शोकपत्रिका छापून ती आप्त आणि मित्रपरिवाराला देण्यास सुरुवात केली. कारण एवढेच होते की, त्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले! (The girl got married against the family)

भिलवाडा जिल्ह्यातील रतनपूर गावातील (Ratanpur in Bhilwara District) ही घटना आहे. तेथील एका कुटुंबातील मुलीने शेजारच्या दंथाल गावातील मुलासोबत प्रेमविवाह केला होता. मुलीच्या कुटुंबीयांना हा मुलगा पसंत नव्हता. मुलीच्या या निर्णयामुळे तिचे वडील दुखावले गेले. त्यांनी थेट जिवंत मुलीच्या निधनाबद्दलची शोकपत्रिका छापली आणि ती वाटण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, 1 जून 2023ला तिचे निधन झाल्याचे सांगून 13 जून रोजी श्राद्धही ठवले आणि लोकांना आमंत्रित केले.

- Advertisement -

या प्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, मात्र रतनपूर गावातील एका अल्पवयीने मुलीने दंथाळ गावातील (Danthal village) एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता. नंतर तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचे ठरविले. परंतु विवाहकार्य होण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला आणि काही महिन्यांपूर्वीच मुलीच्या कुटुंबीयांनी कांडा गावातील दुसऱ्या मुलासोबतचे लग्न जुळवले होते, अशी माहिती मंगरूप पोलीस (Mangrop police station) अधिकाऱ्यांनी दिली.

आईने 17 मे रोजी हमीरगड पोलीस ठाण्यात (Hamirgarh police station) आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्याआधारे पोलीस तिचा शोध घेत होते. त्याच दरम्यान, 1 जून रोजी बेपत्ता मुलगी आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आपण सज्ञान (Adult) असल्याची कागदपत्रे सादर केली. त्यानुसार ती 27 मे 2023 रोजी प्रौढ झाली होती. त्यानंतर तिने 1 जून 2023 रोजी त्यांनी आर्य समाज पद्धतीने विवाह केला होता.

- Advertisement -

पोलिसांसमोर तिने यापुढे पतीसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण केले, मात्र त्यांनी त्या मुलीला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीला पतीसोबत जाण्याची परवानगी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -