घरElection 2023Rajasthan Elections 2023 : महिलांना दरवर्षी 10,000 रुपये; काँग्रेसचा तीन मुद्द्यांवर भर

Rajasthan Elections 2023 : महिलांना दरवर्षी 10,000 रुपये; काँग्रेसचा तीन मुद्द्यांवर भर

Subscribe

जयपूर : राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपापल्या पातळीवर जोरदार तयारी केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने जयपूरमध्ये एका कार्यक्रमात आज (21 नोव्हेंबर) राज्यासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकरी, महिला आणि तरुणांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (Rajasthan Elections 2023 Rs 10000 per year to women Congress emphasis on three issues Mallikarjun Kharge Ashok Gehlot)

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले की, राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा आणला जाईल. याशिवाय चिरंजीवीच्या विम्याची रक्कम 25 लाखांवरून 50 लाख रुपये करण्यात येईल. तसेच तरुणांना चार लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आणि 10 लाख तरुणांना इतर रोजगाराशी जोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Election 2023 : सट्टेबाजांनी जाहीर केला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालाचा अंदाज

महिलांना 10,000 रुपये देण्याचे आश्वासन 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार, पंचायत स्तरावर सरकारी नोकऱ्यांचे नवे संवर्ग तयार केले जातील. तसेच महिलांच्या मदतीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सध्या 500 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर 400 रुपयांवर आणण्याचे आणि कुटुंबातील महिला प्रमुखांना 10 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

बारावीपर्यंत मोफत शिक्षण

राज्यात आरटीई कायदा आणण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्याअंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. तसेच मनरेगा आणि इंदिरा गांधी शहरी रोजगार 125 वरून 150 दिवसांपर्यंत वाढवली जाईल. याशिवाय लहान व्यापारी आणि दुकानदारांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यासाठी मर्चंट क्रेडिट कार्ड योजनाही सुरू करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

हेही वाचा –  राजस्थानच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री; ‘या’ आमदाराचा करणार प्रचार

सरकारी कर्मचाऱ्यांना चौथी श्रेणी देण्याचे आश्वासन

राज्यात सरकार स्थापन होताच काँग्रेसने सरकारी कर्मचाऱ्यांना 9,18,27 सोबत चौथी वेतनश्रेणी देण्याचे तसेच अधिकाऱ्यांना सर्वोच्च मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय राज्यातील 100 पर्यंत लोकसंख्या असलेली गावे आणि वाडे रस्त्याने जोडने, प्रत्येक गाव आणि शहरी प्रभागात सुरक्षा रक्षक तैनात करणे, घरबांधणीचा हक्क कायदा आणून प्रत्येकाला घर देणे आणि राज्य सरकारच्या आधीच सुरू असलेल्या योजनांना अधिक बळकटी देण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -