ईशा अंबानीच्या लग्नात नृत्य सादर करणाऱ्या क्वीन हरीशचा अपघाती मृत्यू

राजस्थानी लोक नृत्य सादर करणाऱ्या क्वीन हरीश यांचा रविवारी दुपारी एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Folk-Dancer Queen-Harish
लोकप्रिय नृत्यांगणा हरिश

राजस्थानी लोक नृत्य सादर करणाऱ्या क्वीन हरीश यांचा आज, रविवारी दुपारी एका रोड अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील लोकप्रिय क्वीन हरीश यांचा जोधपूरमधील कापरडा येथे ट्रकची इनोव्हा कारला धडक झाल्याने अपघातील मृत्यू झाल्याचे समजते. नृत्यांगणा हरीशसोबत त्यांच्या ४ साथीदारांचाही यावेळी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. क्वीन हरीश जैसलमेरवरून जयपूर येथे एका कार्यक्रमाकरता जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तर मृतदेहांना बिलाडा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.

हरीशच्या जाण्याने मोठी पोकळी 

पुरुष असतानाही महिलेच्या रुपात तितक्याच नजाकतीने राजस्थानची लोककला सादर करणाऱ्या क्वीन हरीशच्या मृत्यूने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्या अपघाती मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत क्वीन हरीश यांच्या मृत्यूमुळे लोककाल क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले आहे.

ईशा अंबानीच्या लग्नात क्वीन हरीश 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्या लग्नाचा शाही सोहळा जयपूरमध्ये पार पडला होता. यावेळी क्वीन हरीश यांनीदेखील राजस्थानची लोककला सादर केली होती. तिच्या नृत्याला दाद देत अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांनीही ठेका धरला होता. त्यावेळीही हरीश चर्चेत आली होती.

लोकप्रिय नृत्यांगणा हरिश