घरताज्या घडामोडीGovernment Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राजस्थान सरकारची मोठी घोषणा, नवी व्यवस्था लागू

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राजस्थान सरकारची मोठी घोषणा, नवी व्यवस्था लागू

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राजस्थान सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात घसघसीत वाढ केल्यानंतर आणि पदोन्नतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकारने आणखी एक गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आपलं वेतन अॅडव्हान्समध्ये घेता येईल, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थान सरकार कर्मचाऱ्यांवर सध्या खूप मेहेरबान आहे असं दिसतंय. तसेच ही नवीन व्यवस्था १ जून २०२३ म्हणजेच आजपासून लागू करण्यात आली आहे.

राजस्थान सरकारची मोठी घोषणा

राज्य सरकारचे कर्मचारी आणि अधिकारी आपल्या वेतनातील अर्धा हिस्सा अॅडव्हान्स म्हणून घेण्यासाठी हक्कदार असणार आहेत. एकावेळी २० हजार रुपयांचं कमाल आगावू वेतन जमा केलं जाणार आहे. वित्त विभागाने एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीसोबत करार केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये इतर वित्तिय संस्थांशी करार करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये काही बँकांचाही समावेश आहे.

- Advertisement -

राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून घोषणांचा मोठा पाऊस पाडला जात आहे. अॅडव्हान्समध्ये पगार घेतल्यावरही सरकारी कर्मचाऱ्यांना व्याज द्यावं लागणार नाहीये. वित्तसंस्था केवळ ट्रान्झॅक्शन चार्जच वसूल करतील आणि अर्ध वेतन मिळण्याच्या आधीच सुविधेमुळे छोट्या कर्मचाऱ्यांना त्याचा अधिक लाभ मिळणार आहे.

तामिळनाडूत डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ

अलीकडेच तामिळनाडू राज्य सरकारने आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि आसाम या राज्यातील राज्य शासनाने देखील तेथील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ३ टक्के डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गुजरात सरकारकडून डीएमध्ये ८ टक्क्यांनी वाढ

गुजरात सरकारने देखील आपल्या राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी ८ टक्के डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय निश्चितच तेथील कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून या निर्णयाचा गुजरातमधील साडेनऊ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ

उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील वाढ करण्यात आली आहे. ४२ टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात १६.३५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ११ लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.

बिहारमध्ये देखील वाढला महागाई भत्ता

बिहारच्या राज्य सरकारने देखील महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा ४ टक्के महागाई भत्ता बिहारमध्ये वाढवण्यात आला आहे. तर पेन्शन धारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे.


हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘तो’ महागाई भत्ता मिळणार नाही, केंद्र सरकारने केले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -