घरताज्या घडामोडीRajasthan Live Update : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Rajasthan Live Update : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Subscribe

राजस्थानमधील राजकीय धुमाकुळीचा फटका आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना बसत आहे. राज्यातील काँग्रेस नेचे संजय झा यांना पक्षाने निलंबित केले आहे. सचिन पायलट यांना समर्थन दर्शवल्याने काँग्रेस पक्षाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

उद्या, १५ जुलै रोजी भाजप पक्षाचीही महत्त्वाची बैठक जयपूरमध्ये पार पडणार आहे. राजस्थानमधील राजकीय सद्यस्थितीवर आधारीत ही बैठक होईल. सध्या ढोलपूरमध्ये असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे जयपूरमध्ये दाखल झाल्यानंतर बैठकी सुरू होईल.

- Advertisement -

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर अनेक आमदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त केला. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. त्या सर्वांचे सचन पायलट यांनी आभार मानले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आभारी असल्याचे म्हटले आहे.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत कॅबिनेट बैठकीसाठी हॉटेलमधून रवाना. सोबत इतरही आमदार बसमधून बैठकीसाठी निघाले.


राजस्थानमधील टोंग युनिटच्या ५९ ऑफिस पदाधिकाऱ्यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ राजीनामे दिले आहेत.


भाजप नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजस्थानच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, मी यापूर्वी सांगितले होते. काँग्रेसच्या सद्यस्थितित कर्तृत्व असणाऱ्यांसाठी जागा नाही. हेच चित्र एक-एक राज्यात पाहायला मिळत आहे.


हे मॅनेजमेंट भाजपचे आहे. जे त्यांनी या पूर्वी मध्य प्रदेशमध्ये केले. तेच ते आता राजस्थानमध्ये करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडे दुसरा पर्याय उरतोच कुठे, असा सवाल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला आहे.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी सायंकाळी साडेसात वाजता कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच ८ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.


काँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सचिन पायलट यांना काँग्रेसविरुद्धच्या बंडखोरीचा फटका बसला आहे. काँग्रेसने पायलट यांच्याविरुद्ध कारवाई करत त्यांना उपमुख्यमंत्री पदावरुन तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. यानंतर सचिन पायलट यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीआहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका ओळीचं ट्विट करत सचिन पायलट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (सविस्तर वाचा)

पायलट भाजपच्या षडयंत्रात सामील; काँग्रेसचा गंभीर आरोप

राजस्थानमधील सत्तासंघर्षात सचिन पायलट यांना फटका बसला आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आली. पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन तसंच प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात पायलट सहभागी होते असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)


तुम्ही आ बैल मुझे मार ही म्हण ऐकली असेलच. सचिन पायलट यांचं धोरण अगदी तसंच आहे. मागील तीन ते सहा महिन्यांपासून ते असंच वागत आहेत. रोज ट्विट करणं, कॅबिनेटमध्ये विरोधात भूमिका घेणं हेच त्यांचं धोरण आहे अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.


पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं

राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाचं निशान हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन देखील हटवण्यात आलं आहे. सचिन पायलट यांच्यासह तीन जणांवर कारवाई केली आहे. गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपमदी नेमण्यात आलं आहे. (सविस्तर वाचा)


राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात मंगळवारी राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप झाला. सचिन पायलटवर कारवाई करत कॉंग्रेस पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकलं आहे. यादरम्यान भाजपच्या योजना पूर्ण होऊ देणार नाही, असं गेहलोत म्हणाले.


सचिन पायलट यांना आता भारतीय जनता पक्षाने ऑफर केली आहे. सचिन पायलट भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असं ओम माथूर म्हणाले. त्याच बरोबर राजस्थानमधील भाजपक लेट अँड वॉचच्या भूमिकेत असून फ्लोर टेस्टची त्वरित मागणी नाकारली आहे.


कॉंग्रेसच्या बैठका सुरु असताना आता भाजपनेही बैठक बोलावली आहे. राजस्थान भाजपकडून दुपारी १२ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे.


राजस्थानमध्ये कॉंग्रेसमध्ये सुरू झालेली सत्ता संघर्ष अद्याप संपलेला नाही. बंड करून दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची समजूत काढण्यात काँग्रेस हायकमांड व्यस्त आहे. दरम्यान जयपूरमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे, ज्यात सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, सचिन पायलट यांचे समर्थक असलेले आमदार अशोक गहलोत यांच्यावर टीका करत आहेत. मुकेश भाकर यांनी सोमवारी रात्री ट्विट करत गेहलोत नेतृत्व आम्हाला मान्य नाही असं म्हटलं आहे.


काँग्रेच्या विधीमंडळ बैठकीला सचिन पायलट उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. सचिन पायलट यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की, “हा विषय निकाली काढण्यासाठी हाय कमांडकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही, आमचे शब्द ऐकले जातील की नाही याची हमी आम्हाला मिळाली नाही.”


राजस्थानमधील सत्तासंघर्ष अद्यापही सुरु असून अशोक गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम आहे. आज पुन्हा काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सचिन पायलट यांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -